काँग्रेसच्या नेतृत्व बदलासाठी १०० नेत्यांचे सोनिया गांधींना पत्र; काँग्रेसचे निलंबित नेते संजय झा यांचा दावा

  • काँग्रेस प्रवक्त्यांनी मात्र दावा फेटाळला; भाजपवरच पलटवार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी चिंता करणारे आणि नेतृत्व बदलाची मागणी करणारे पत्र काँग्रेसच्या १०० नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना पाठविल्याचा दावा संजय झा यांनी केला. मात्र काही वेळातच हा दावा काँग्रेस प्रवक्त्यांनी खोडून काढला.

काँग्रेसचे निलंबित नेते संजय झा यांनी सोमवारी पक्ष नेतृत्वाबाबत दावा केला. काँग्रेस पक्षातील १०० नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून नेतृत्वात बदल करण्याची मागणी केली आहे. परंतू, झा यांच्या दाव्याचे पक्षाकडून खंडन करण्यात आले आहे. पक्षाचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले की, फेसबुक-भाजप लिंकवरून लक्ष विचलीत करण्यासाठी हे प्रकरण आणले जात आहे.

संजय झा यांचा दावा

संजय झा यांनी ट्वीट करुन सांगितले की, पक्षातील १०० नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना एक पत्र लिहीले आहे, ज्यात “पॉलिटिकल लीडरशिप” बदलण्याची मागणी केली आहे. पत्रात काँग्रेस कार्यकारिणीमध्ये पारदर्शी निवडणुका करण्याची मागणीही करण्यात आली आहे. हे सर्व नेते पक्षाच्या अंतर्गत गटबाजीमुळे नाराज आहेत. झा यांच्या दाव्यानुसार पत्र लिहिण्यामध्ये काही खासदारांचाही समावेश आहे.

‘भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहेत’

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी असे कोणतेही पत्र असल्याच्या दाव्याचे खंडन केले. ते म्हणाले की, भाजप-फेसबुक लिंकवरून लक्ष विचलीत करण्यासाठी केले जात आहे. काही नेते भाजपच्या इशाऱ्यावर काम करत आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*