कर्जबाजारी तरीही मग्रुरी; सौदी अरेबियाने पाकिस्तानला दिला झटका

पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. हा देश कर्जबाजारी झाला आहे. अमेरिकेने मदतीचा हात आखडता घेतल्याने आता सौदी अरेबियाच्या मदतीवर अवलंबून आहे. मात्र तरीही सौदी अरेबियावरच मग्रुरी केल्याने पाकिस्तानला झटका दिला आहे. तब्बल १ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करायला लावली आहे.


विशेष प्रतिनिधी 

इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. हा देश कर्जबाजारी झाला आहे. अमेरिकेने मदतीचा हात आखडता घेतल्याने आता सौदी अरेबियाच्या मदतीवर अवलंबून आहे. मात्र तरीही सौदी अरेबियावरच मग्रुरी केल्याने पाकिस्तानला झटका दिला आहे. तब्बल १ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करायला लावली आहे.

जम्मू-काश्मीरच्या मुद्दावर पाकिस्तानला ओआयसी या इस्लामीक संघटनेची साथ मिळू शकली नाही. त्यासाठी पाकिस्तानने सौदी अरेबियाला जबाबदार धरले आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी आगपाखड सुरू केली. मात्र, त्याची किंमत पाकिस्तानला चांगलीच चुकवावी लागली. सौदी अरेबियाने पाकिस्तानला १ अब्ज डॉलरच्या कजार्ची परतफेड करायला भाग पाडलं. २०१८ मध्ये सौदीने पाकिस्तानला ३.२ अब्ज डॉलरच कर्ज दिलं होतं. त्याचा हा भाग आहे.

पाकिस्तानला आथिॅक पातळीवर सौदी अरेबियाची नेहमी मदत होते. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. सौदी अरेबियाच्या प्रिन्सबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगले संबंध निर्माण केले आहेत. त्यामुळे आता सौदी अरेबिया पाकिस्तानला पूर्वीसारखी मदत करण्यास तयारी नाही.

पाकिस्तानमधील वृत्तवाहिनीला दिलेल्या मुदतीत कुरेशी म्हणाले होते की,आम्ही ओआयसीचा मान ठेवतो. ओआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीद्वारे आम्हाला अपेक्षा आहेत. जर ही बैठक आपण बोलावू शकत नसाल तर काश्मीर मुद्द्यावर आमच्यासोबत असलेल्या इस्लामिक राष्ट्रांची बैठक बोलावण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सांगण्यास मी बांधिल आहे.

मागच्याच आठवडयात जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण झालं. पाकिस्तानने यूएनपासून सर्वत्र हा मुद्दा उचलण्याचा जोरदार प्रयत्न केला. पण चीन, टर्की या दोन देशांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना फारशी कोणाची साथ मिळाली नाही. ओआयसीकडून त्यांना भरपूर अपेक्षा होत्या. पण तसे काही घडले नाही.

भारताच्या कृतीचा निषेध करण्यासाठी पाकिस्तान मागच्या अनेक महिन्यांपासून इस्लामाबादमध्ये ओआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक बोलवण्याचा प्रयत्न करत आहे. पण सौदी अरेबिया पाकिस्तानच्या मार्गात असल्यामुळे त्यांना ही बैठक बोलवता आलेली नाही. सौदीने फक्त ओआयसीच्या कॉन्टॅक्ट ग्रुपच्या बैठकीला परवानगी दिली. संयुक्त अरब अमिरातीकडून पाकिस्तानला अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. यूएई सुद्धा या मुद्यावर सौदी अरेबियाला साथ देत आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट सौदीलाच लक्ष्य केले होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*