औरंगाबादमध्ये ४ ऑगस्टला रोडरोमियोंचा तरूणीवर बलात्कार; सुप्रिया सुळेंचे प्रकरणावर लक्ष; आरोपी अद्याप फरार


  • मूळ बातमीपेक्षा नेत्यांच्या ट्विटची दखल घेणाऱ्या न्यूज चँनेलवर नेटकऱ्यांचा संताप

विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : मित्रासोबत फिरायला गेलेल्या १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना ४ ऑगस्टला घडली. खासदास सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन आपण या प्रकरणावर लक्ष ठेवून असल्याचे ट्विट केले. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची तीन पथके रवाना केली. आरोपी अद्याप हाती आले नाहीत. या प्रकरणात मूळ बातमीपेक्षा नेत्यांच्या ट्विटची दखल घेणाऱ्या न्यूज चँनेलवर सोशल मीडियातून टीकेचा भडिमार होतोय.

औरंगाबादच्या भांगसीमाता गड परिसरात समोर आली आहे. ४ ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आजूबाजूच्या परिसरातील असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांची तीन पथके आरोपींचा शोध घेत आहेत.

मात्र, या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून प्रत्येक महिलेच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे. आणि या प्रकरणावर मी लक्ष ठेवून आहे असं म्हटलं आहे. एबीपी माझाने सुप्रिया सुळेंच्या ट्विटची बातमी दिली आहे. महाराष्ट्राचे गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे आणि सुप्रिया सुळे ट्विट करून महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाची आहे, असे म्हणताहेत. ४ ऑगस्टचे बलात्काराचे आरोपी अद्याप फरार आहेत.

सोशल मीडियावर या प्रकरणी नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. काही वर्षांपूर्वी याच परिसरात अशाच प्रकारची घटना समोर आलेली होती. औरंगाबादच्याच गतिमंद मुलीवर अत्याचार झाले होते. त्याबद्दल नंतर बातमी आलीच नाही. न्यूज चॅनेल वाल्यांनी अशा दुर्दैवी घटनांचा पाठपुरावा करून हरामखोरांना फाशी होईपर्यंत बातमी दाखवली पाहिजे. पण तसं घडले नाही, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. बघू या आरोपींना २१ दिवसांत फाशी होती का?, असा सवालही सोशल मीडियातून करण्यात येत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती