एसटी महामंडळातील निर्भयांवर वेतनासाठी विनवणीची वेळ, मुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांकडून नाही दखल


चीनी व्हायरसच्या संकटकाळात एसटीच्या कर्मचार्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी अनेक निवेदने देऊनही त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता एसटी महामंडळातील निर्भया समितीच्या महिला सदस्यांनी मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांना विनवणी केली आहे.  


विशेष प्रतिनिधी

मुंबई : चीनी व्हायरसच्या संकटकाळात एसटीच्या कर्मचार्यांना तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी अनेक निवेदने देऊनही त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आता एसटी महामंडळातील निर्भया समितीच्या महिला सदस्यांनी मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांना विनवणी केली आहे.

कर्मचार्यांना मागील तीन महिन्यांचे थकलेले वेतन द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे मे महिन्यांचे अर्धे वेतन आणि जून-जुलै महिन्यांचे पुर्ण वेतन थकलेले आहे. याबाबत वारंवार राज्यातील वेगवेगळ्या संघटनांनी अनेक निवेदनं देखील दिली आहेत.

परंतु, अद्याप वेतनाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे एसटी महामंडळातील निर्भया समितीच्या सदस्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना पोस्टाने राखी पाठवली आणि सोबत मागणीचे निवेदन देखील पाठवले आहे.

सध्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कर्मचाऱ्यांना कुटुंब चालवण्यासाठी वेगळे व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. अगोदरच कर्मचार्यांना कमी पगार आहे. त्यातच महामंडळाकडून रोज नवनवीन परिपत्रके काढून कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करण्यात येतं आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील सर्व विभागातून सर्व निर्भया प्रमुखांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांना मागण्यांचे निवेदन पाठवलं आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था