एक रुपया दाम लगाया सुप्रीम कोर्ट ने बंदे का, अनुपम खेर यांचा प्रशांत भूषण यांच्यावर निशाणा

एक रुपया दाम लगाया सुप्रीम कोर्ट ने बंदे का ! और वो भी उसने अपने वकील से लिया!! जय हो!! अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यावर निशाणा साधला आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : एक रुपया दाम लगाया सुप्रीम कोर्ट ने बंदे का ! और वो भी उसने अपने वकील से लिया!! जय हो!! अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्यावर निशाणा साधला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी शिक्षा सुनावताना ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठवण्यात आला. प्रशांत भूषण यांनी ट्विट करून सरन्यायाधीश शरद बोबडे व सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं होतं.

यावर शिक्षा सुनावताना प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड ठोठवण्यात आला. तर यानंतर प्रशांत भूषण यांनी लगेचच एक ट्विट केलं. प्रशांत भूषण यांनी ट्विट करत न्यायालयाच्या निर्णयानंतर आपले वकील आणि ज्येष्ठ सहकारी राजीव धवन यांनी एक रुपयाचं योगदान दिलं असून आपण ते तात्काळ स्वीकारलं असल्याचं म्हटलं.

त्यावर अनुपम खेर यांनी ट्विट करून म्हटले आहे की, म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांचं मूल्य केवळ १ रूपया इतकंच असल्याचं दाखवून दिलं आणि तो एक रूपयासुद्धा त्यांना त्यांच्या खिशातून देता आला नाही. त्यांच्या वकिलांनी त्यांनी रूपया दिला, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले.

न्यायालयाने प्रशांत भूषण यांनी १५ सप्टेंबरपर्यंत हा दंड भरण्यास मुदत दिली आहे. दंड न भरल्यास प्रशांत भूषण यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास तसंच तीन वर्षांकरिता वकिली करण्यापासून रोखलं जाईल असे म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*