उर्जामंत्र्यांचा अजब दावा, म्हणे वर्क फ्रॉम होममुळे वाढले वीजबिल

नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक दिल्यानंतर उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आता अजब दावा केला आहे. लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होममुळे वीज बिल वाढल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक दिल्यानंतर उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आता अजब दावा केला आहे. लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होममुळे वीज बिल वाढल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.

संपूर्ण राज्यातील जनता वाढीव वीज बिलामुळे होरपळत आहे. महिन्याच्या सरासरीपेक्षा दुपटीहून अधिक बिल आल्याने लोक हैराण झाले आहेत. वीज मंडळांच्या कार्यालयासमोर नागरिकांच्या बिल कमी करून घेण्यासाठी रांगा लागल्या आहेत.

या परिस्थितीत कर्मचार्यांकडून माहिती घेऊन उत्तर देण्यापेक्षा राऊत यांनी जादा बिलाचे कारण वर्क फ्रॉम होमवर फोडले. मात्र, महिन्याचे ३० युनीटपेक्षा, १०० युनीटपेक्षा कमी वापर असलेले कसले वर्क फ्रॉम होम करत आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे नागरिक म्हणत आहेत.

पुण्यातील  संजय कुदळे म्हणाले, महिन्याला सरासरी साडेतीनशे ते चारशे रुपये बिल येते. या वेळी अकराशे रुपये बिल आले आहे. वर्क फ्रॉम होमचा प्रश्नच नाही कारण घरात संगणकच नाही. तरीही बिल जादा कसे आले, असा त्यांचा सवाल आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून प्रामाणिकपणे बिल भरणार्यांनाही मोठा झटका देण्यात आला आहे. गेले तीन महिने चीनी व्हायरसच्या संकटामुळे मीटरचे रिडींग घेतले नव्हते. त्यामुळे सरासरी काढून बिल दिले होते. रिडींग घेतल्यावर आता फरक वसूल करत जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

एका बाजुला अनेकांनी तक्रार केल्यावर त्यांचे बिल कमी करून घेतल्याचे वास्तव असताना पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, विजेचा अधिक वापर होत असल्याने जास्त बिल आले आहे. वीजबिल वाढीव पाठवलेले नाही.
विशेष म्हणजे ज्यांचा विज बिल वापर कमी आहे, त्यांचे बिलच जास्त वाढले आहे. गोरगरीबांना याचा सर्वात फटका बसला आहे. १ एप्रिल २०२० पासून स्थिर वीज आकार वाढविल्याच्या मुद्यावर मात्र राऊत यांनी चुप्पी साधली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*