उध्दव ठाकरे नको म्हणतात, पण विद्यार्थी म्हणतात जेईई-नीट परीक्षा घ्याच

जेईई आणि नीट परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी-पालकांचाच आमच्यावर दबाव होता असा दावा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केला आहे. त्यामुळे जेईई-नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा देणाऱ्या उध्दव ठाकरे आणि इतर मुख्यमंत्र्यांच्या दाव्यातील हवाच निघून गेला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जेईई आणि नीट परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थी-पालकांचाच आमच्यावर दबाव होता असा दावा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केला आहे. त्यामुळे जेईई-नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा देणाऱ्या उध्दव ठाकरे आणि इतर मुख्यमंत्र्यांच्या दाव्यातील हवाच निघून गेला आहे.

रमेश पोखरियाल निशंक म्हणाले की, विद्यार्थी आणि पालकांकडून सतत दबाव होत असल्यानेच परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. जेईई आणि नीट परीक्षेसाठी परवानगी का देत नाहीत यासाठी आम्ही सतत पालक आणि विद्यार्थ्यांच्या दबावात होतो. या परीक्षाबाबत विद्यार्थांना काळजी लागली होती. अजून किती वेळ अभ्यास करायचा ही चिंता त्यांना भेडसावत होती.

त्यामुळे जेईई आणि नीट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगून पोखरियाल म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मास्क, ग्लोव्ह्ज, पाण्याची बाटली आणि सॅनिटायजर सोबत ठेवणे अनिवार्य असणार आहे. जेईई परीक्षेसाठी सुमारे साडे आठ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यातील 7 लाख 25 हजार विद्यार्थ्यांनी अ‍ॅडमिट कार्ड डाउनलोड केले आहे.

वास्तविक या दोन्ही परीक्षा मे महिन्यातच होणार होत्या. गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी अभ्यास करत आहेत. त्यामुळे त्यांचा संयमही संपला आहे. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह बिगर भाजप राज्यांतील मुख्यमंत्री या परीक्षा रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या धमक्या देत आहेत. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*