उध्दव ठाकरे अपयशी; मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनींग घ्यावे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपयशी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावे, असा सल्ला बिहार भाजपाचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी दिला आहे. शिवसेनेने आता नाव बदलून ‘बाबर सेना’ असे नाव ठेवावे असेही त्यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अपयशी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावे, असा सल्ला बिहार भाजपाचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी दिला आहे. शिवसेनेने आता नाव बदलून ‘बाबर सेना’ असे नाव ठेवावे असेही त्यांनी म्हटले आहे.

अभिनेत्री कंगना राणावतचे प्रकरण असो की महाराष्ट्रातील चीनी व्हायरसचा उद्रेक ही प्रकरणे ठाकरे यांनी व्यवस्थित हाताळली नाही. कंगनावर आरोप-प्रत्यारोपात येथील सामाजिक वातावरण दूषीत झाले आहे. एका महिलेला केंद्र सरकारकडून ‘वाय’ सुरक्षा घेऊन मुंबईत यावे लागले आहे. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचे दिसत आहे. उध्दव ठाकरे गेल्या सहा महिन्यांपासून घराच्या बाहेर पडत नाहीत.

या पार्श्वभूमीवर डॉ. निखिल आनंद म्हणाले, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्यं ही एका लोकप्रिय जननेत्याची वक्तव्यं आहेत. सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडून काहीतरी शिकलं पाहिजे. अभिनेत्री कंगनाने मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असे वक्तव्य केले होते. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना यांच्या आरोपांच्या फैरी झडल्या होत्या.

त्यानंतर ९ सप्टेंबरला आपण मुंबईत येणारच असं आव्हान कंगनाने दिलं होतं. त्यानुसार ती मुंबईत आली होती, याच दरम्यान तिचं मुंबईतील कार्यालय मुंबई महापालिकेने पाडले. त्यावरुन पुन्हा एकदा भाजपा आणि शिवसेना यांच्यात वाद रंगला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*