उद्धवराव घसरले ७ वर; माध्यमांनी सरकवले ५ वर…!!


  • उद्धव यांच्या घटत्या लोकप्रियतेबाबत “निवडक” मराठी माध्यमांची दडपेगिरी
  • योगी २४%, ममता ९%, उद्धव ७%

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांची लोकप्रियतेत घसरगुंडी उडाली आहे. परंतु, मराठी माध्यमांना उद्धव ठाकरे यांच्या घसरत्या लोकप्रियतेचे “वैषम्य” वाटून त्यांनी उद्धव ठाकरे यांना टॉप ५ मध्ये ठेवलेले दिसतेय.

वास्तविक इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या टक्केवारीच्यी चार्टमध्ये उद्धव ठाकरे हे ७% मतांसह ७ व्या क्रमांकावर दिसताहेत. परंतु, महाराष्ट्र टाइम्स, एबीपी माझा, झी २४ तास, आयबीएन लोकमत आदी “निवडक” मराठी माध्यमांनी दडपेगिरी करत उद्धव ठाकरे यांना टॉप ५ मध्येच ठेवण्याचे “उद्योग” केले आहेत.

उद्धव ठाकरे यांचा गौरव काही माध्यमे बेस्ट मुख्यमंत्री म्हणून करत होती आणि आहेत. शिवसेनेने यावर पोस्टरबाजीही केली होती. परंतु, इंडिया टुडेच्या २०१९ नंतरच्या तीनही सर्व्हेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रथम क्रमांकाचे मुख्यमंत्री ठरले आहेत. यावेळी तर त्यांच्या मतांमध्ये ६% वाढ होऊन २४% टक्के मते मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत.

‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ यांना एकूण २४% मते मिळाली आहेत. ठाकरे – पवार सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “बेस्ट सीएम” पदावरून घसरून ७ व्या क्रमांकावर आले आहेत.

गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत योगी आदित्यनाथांची मते ६ % वाढली आहेत. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असतानाही योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर लोकांनी समाधान व्यक्त केल्याचे दिसत आहे.

सर्वेक्षणानुसार, पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री हे भाजपा आणि काँग्रेसची सत्ता नसणाऱ्या राज्यांचे आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी ४ क्रमांकावर घसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना ९ % मते मिळाली आहेत. अन्य मुख्यमंत्री या पर्यायाला ८ % मते, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ % मते मिळाली असून ते दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ११ % मतांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. उद्धव ठाकरे प्रत्यक्षात ७% मतांसहित ७ व्या क्रमांकावर आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था