उद्धव-आदित्य ठाकरेंवर टीका करणाऱ्या समीत ठक्करला अटक, छळवणूक; मित्र राहिले उभे त्याच्या बाजूने


  • सोशल मीडियावर समीतला वाढता पाठिंबा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : सोशल मीडियावरील आपल्या ट्वीटमध्ये समीर ठक्कर या व्यक्तीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा ‘औरंगजेब’, तर आदित्य ठाकरे यांचा बेबी पेंग्वींन (‘Baby Penguin’) असा उल्लेख केला होता. या उल्लेखामुळे त्यांच्यावर मुंबई शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणामुळे समीतची छळवणूक सुरु असून त्यांचे बोलणे हे खरेच होते,असे सांगत त्यांची मित्रमंडळी समीतच्या बाजूने उभी ठाकली आहेत.

समीतने सोशल मीडिया व्यासपीठ ट्विटरवरुन जून आणि जुलै महिन्यामध्ये काही ट्विट केले होते. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची तुलना मुघल राजाशी केली तसेच, उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याबद्दलही आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

ठक्कर याने मंत्र्यांसोबत राज्य सरकारचीही खिल्ली आपल्या टिव्टद्वारे उडवली आणि शिवीगाळही केली, समीतची ही टिका सत्ताधाऱ्यांना चांगलीच झोंबली. त्याविरूध्द शिवसेना पक्षाचे कायदेशीर सल्लागार धरम मिश्रा यांनी व्ही. पी. रोड पोलिसांत लेखी तक्रार दिली.

त्यावरुन पोलिसांनी समीतवर कायदेशीर कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार आक्षेपार्ह लिखाण, लेख, चित्र, चित्रफीत अथवा कथीत माहिती प्रसारित करण्याविरुद्धच्या कायद्यातील विविध कलमांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्ही. पी. रोड पोलिसांनी समीत यांचा जवाब घेण्यासाठी समन्स बजावला आणि त्यानंतर त्याला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देत त्यांची छळवणूक सुरु केली.

वेगवेगळे आरोपही त्याच्यावर करण्यात आले. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह सध्याच्या सरकारच्या प्रकरण दाबण्याच्या कृतीमुळे समीतचे ते वक्तव्य योग्यच असल्याचे त्यांच्या नागपूरसह विविध भागातील मित्राचे म्हणणे असून ते त्यांच्या बाजूने उभे राहिले आहे, आम्ही समीतला खंबीरपणे साथ देऊ,असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था