आलियाच्या ‘सडक 2’ ट्रेलरचा dislikes चा विक्रम; ५३ लाख प्रेक्षकांची नापसंती

  • बॉलिवूडच्या घराणेशाही विरोधात प्रेक्षकांचा संताप

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या संशयास्पद मृत्यूनंतर अनेकांकडून चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट आणि आलिया भट्टला सोशल मीडियावर सतत ट्रोल केले जात आहे. सुशांतचे चाहते या दोघांवर बॉलिवूडच्या घराणेशाहीचा आरोप करत आहेत. याच दरम्यान आलिया भट्टच्या आगामी ‘सडक 2’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. त्याला ५३ लाख लोकांनी dislike करून विक्रम रचला. ट्विटरवरूनही Sadak2dislike अशा प्रकारचा हॅशटॅग वापरून आलियाला पुन्हा ट्रोल करण्यात येत आहे.

 

काल १२ ऑगस्ट रोजी ‘सडक 2’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. त्याला केवळ ३ लाखांच्या आसपास लोकांनी लाईक केले. तर तब्बल ५३ लाखांहून अधिक लोकांनी ट्रेलरला नापसंती दर्शवली आहे. आलियाने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांपैकी, हा पहिल्याच असा चित्रपट आहे ज्याला लोकांनी सर्वाधिक नापंसती दर्शवली आहे. ट्रेलरला डिसलाईक केले आहे.

“सडक 2′ चित्रपट 28 ऑगस्ट रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.  

आलियाने ट्रेलर स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंटवरही शेअर केला. पण त्याचे dislikes पाहून कॉमेंट बॉक्स बंद करून टाकले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*