आयुर्वेदातील गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचा राज्यभर महोत्सव


विशेष प्रतिनिधी

नाशिक : सहयाद्रीच्या वनसंपदेचे वैशिष्टये आणि आदिवासी बांधवांकडून परंपरेने उपलब्ध केल्या जाणाऱ्या रानभाज्यांना पावसाळ्यात खूप मागणी असते. या रानभाज्या महोत्सव घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने पुढाकार घेतला असून थेट मंत्रालयासह राज्याच्या विविध भागात हा महोत्सव होईल, त्यातून गरीब आदिवासी बांधवांना रोजगार मिळण्यास मदत होईल.

नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन आहे.त्यानिमित्त राज्यात रानभाज्या महोत्सव घेण्यास येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची कृषिमंत्री दादा भुसे यांनी भेट घेतली. औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांची विक्री व्यवस्था बळकट करून हा ठेवा सर्वांसाठी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करतानाच रानभाज्यांच्या संवर्धानातून आदिवासी बांधवांची समृध्दी ही संकल्पना कृषी विभागातर्फे अवलंबिण्यात येईल.

कृषीमंत्र्यांनी कधी नव्हे एकदा चांगला पुढाकार घेऊन काम केले आहे. त्यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात साकारलेल्या रानभाज्या महोत्सवाची सुरवात मंत्रालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आली. त्यात शहापूर व वाडा येथील आदिवासी भगीनी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या या महोत्सवाचे नियोजन करण्याचे प्रशासनाला भुसे यांनी निर्देश दिले आहे. या रानभाज्या नागरीक्ना कायमस्वरूपी कशा उपल्ध होतील, हेही पाहिले जाणार आहे. शेतकरी गट,शेतकरी,उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून हा रानभाज्याचा औषधी ठेवा शहरातील नागरीकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे कृषीमंत्र्यांना सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था