चंद्रकांतदादांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना तडकावले; “कोणाच्या धमकीला घाबरत नाही”; हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या धमकीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत आम्ही कोणाला घाबरात नाही, पण याचा शेवट काहीही होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर:  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या धमकीवर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत आम्ही कोणाला घाबरात नाही, पण याचा शेवट काहीही होऊ शकतो, असा इशारा दिला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या नेत्यांना धमकाविले आहे. आम्हीही शिव्या देऊ शकतो, असा इशारा दिला आहे.  
 
याबाबत बोलताना पाटील म्हणाले, कुणी कुणाला धमकी द्यायची आवश्यकता नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही. सुरुवात कोणी केली महत्त्वाचे नाही. पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडत चालली आहे. तुम्ही जे पेरता तेच उगवते एकत्र बसून बिघडलेली राजकीय संस्कृती नीट केली पाहिजे. अन्यथा याचा शेवट काहीही होऊ शकतो.
भाजपच्या नेत्यांवरही खूप खालच्या शब्दात टीका होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल देखील वाईट शब्द वापरले जातात. राज्यात कोण चंपा म्हणतं, कोण टरबुजा म्हणतं, हे कसं चालतं?’ 
 
आपण वादग्रस्त विधान करणार नाही, असे हसन मुश्रीफ यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते. पण आज ते पुन्हा वेगळे बोलले आहेत. त्यामुळे त्यांना गंभीरपणे घेण्याची गरज नाही. याच्या खोलात गेले तर आणखी कलगीतुरा होऊ शकतो. मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत अशा पद्धतीची विधाने आणि राजकारण बसणारे नाही. त्यामुळे एकदाचा हा विषय संपला पाहिजे. अन्यथा हा विषय कोठेपर्यंत ही कुठेही भरकटू शकतो, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*