आणिबाणीत अवघ्या १३ वर्षांच्या बालकाला तीन महिने डांबले होते तुरुंगात

आणिबाणीच्या काळ्या आठवणी अद्यापही ताज्या असताना अवघ्या १३ वर्षांच्या बालकाला तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तीन महिने तुरुंगात डांबल्याची आठवण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपाळकृष्ण आगरवाल यांनी ‘द प्रिंट’ या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात सांगितली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : आणिबाणीच्या काळ्या आठवणी ताज्या करत असताना अवघ्या १३ वर्षांच्या बालकाला तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तीन महिने तुरुंगात डांबले असल्याचा प्रसंग लिहिला आहे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते गोपाळकृष्ण आगरवाल यांनी. आगरवाल यांनी आपल्यावरील आपबिती ‘द प्रिंट’ या वेबसाईटवर लिहिलेल्या लेखात व्यक्त केलीय.

आणिबाणीच्या काळात देशातील सर्व लोकशाही संस्थांवर घाला घातला होता. परंतु, कायदाही पाळला जात नव्हता. देशातील अनेक बुध्दीवंत आणिबाणीच्या वरवंट्याला घाबरून इंदिरा गांधींच्या ताटाखालचे मांंजर बनले होते. परंतु, अनेकांनी आणिबाणीचा प्राणपणाने विरोध केला. त्यामध्येच गोपाळकृष्ण आगरवाल यांचा समावेश होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी आणिबाणीला विरोध केला. त्यामध्येच आपण एक होतो, असे आगरवाल म्हणतात. 

ते त्यावेळी नवी दिल्लीतील भारतीय विद्या भवन या शाळेत आठवीत शिकत होते. आणिबाणीला विरोध करण्यासाठी सत्याग्रहात ते सामील झाले. आणिबाणीला विरोधासाठी स्थापन झालेल्याआपत्काल संघर्ष समितीमध्ये ते सामील झाले.
इंदिरा गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त १९ नोव्हेंबर १९७५ रोजी सरकारने विद्यार्थी, पालक आणि परदेशी राजदूतांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी परदेशी माध्यमाच्या प्रतिनिधींना आवर्जून बोलविण्यात आले होते. तत्कालिन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे मुख्य भाषण होते. इंडिया गेटजवळील नॅशनल स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होते. आगरवाल यांच्या गटामध्ये आठ जण होते. ते सगळे व्यासपीठाच्या मागे थांबले होते. 
मुलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमानंतर राष्ट्रपती बोलण्यासाठी उभे राहिले. याच वेळी आगरवाल यांच्या गटाने आणिबाणी विरोधात घोषणा सुरू केल्या. आणिबाणी हटवा, इंदिरा गांधी मुर्दाबाद, शेम शेम अशा घोषणा देत ते सगळे जण व्यासपीठासमोर आले. आगरवाल यांनी आपल्या हातातील पत्रके प्रेक्षकांकडे भिरकावली. पोलीसांनी त्यांना तातडीने अटक केली.  त्यांना टिळक मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. येथील एक दिवसाचा मुक्काम आजही त्यांच्या अंगावर काटा आणतो. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. थर्ड डिग्री लावून चौकशी करण्यात आली. पोलीसांनी जबर मारहाण केली. 
तेथेच दिवसभर ठेवण्यात आले. दुसऱ्या दिवशी न्यायालयात हजर करण्यात आले. आगरवाल यांना तुरुंगात नेण्यात आले. गुन्हेगारांच्या सोबत त्यांना ठेवण्यात आले. तब्बल ३ महिने त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते. विशेष म्हणजे प्राध्यापक असलेले त्यांचे वडीलही तुरुंगात होते.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*