अ‍ॅपलसाठी प्रॉडक्शन करणाऱ्या कंपनीने गुंडाळला चीनमधून गाशा, भारताकडे पाठविली मशीनरी


चीनी व्हायरसच्या उद्रेकासाठी चीनला जबाबदार धरून तेथील उद्योगांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया संपूर्ण जगभर चालूच आहे. अ‍ॅपल या जगप्रसिध्द कंपनीसाठी प्रॉडक्शन करणार्या कंपनीने चीनमधून गाशा उलगडला आहे. या कंपनीची मशीनरी भारताकडे येण्यासाठी निघालीही आहे.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या उद्रेकासाठी चीनला जबाबदार धरून तेथील उद्योगांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया संपूर्ण जगभर चालूच आहे. अ‍ॅपल या जगप्रसिध्द कंपनीसाठी प्रॉडक्शन करणार्या कंपनीने चीनमधून गाशा उलगडला आहे. या कंपनीची मशीनरी भारताकडे येण्यासाठी निघालीही आहे.

चीनी व्हायरसचा उद्रेक होऊनही चीनने ही गोष्ट जगापासून लपविली. जगाच्या आरोग्य आणि आर्थिक व्यवस्थेला यामुळे हादरा बसला.

त्यामुळे संपूर्ण जगातूनच चीनबाबत संताप व्यक्त होत आहे. जगातील उत्पादनाचे सर्वात मोठे केंद्र असलेल्या चीनमधील परदेशी उद्योगही यामुळे आता येथून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अ‍ॅपलसाठी उत्पादन करणार्या कंपनीने चीनमधील ६ प्रॉडक्शन लाइन भारतात हलविण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी भारतात आल्यामुळे कमीत कमी ५५ हजार लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

अ‍ॅपलच्या टॅबलेट आणि संगणकासाठी भारतामध्ये प्रॉडक्शन लाइन सुरू केली जाणार आहे. या  कंपनीचे सामान घेऊन कंटेनर आधीच भारतात दाखल झाले आहे. अ‍ॅपलसाठी निर्मिती करणार्या फॉक्सकॉन, पेगट्रॉन, विसट्रॉन यासारख्या कंपन्यांनाही भारतामध्ये आपले उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे.

चीनसोबतच्या आर्थिक युध्दाचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात येणार्या कंपन्यांसाठी  प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे सरकार कंपन्यांना ४१ हजार कोटी रुयपांचे इसेंटिव्ह देणार आहे.त्याचबरोबर भारतामध्ये येणार्या कंपन्यांसाठी अनेक सवलतीही जाहीर केल्या आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांंनीही परदेशी कंपन्यांना राज्यात आकर्षित करण्यासाठी योजना जाहीर केल्या आहेत.

आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच वर्षात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ११.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे ३ लाख प्रत्यक्ष तर ९ लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळणार आहे. या कंपन्यांनी उत्पादन सुरू केल्यानंतर ७ लाख कोटी रुपयांची निर्यात केली जाणार आहे. या योजनेनुसार तयार झालेले ६० टक्के फोन निर्यात केले जाणार आहेत. या योजनेनुसार मोबाइल निर्मिती करणार्या कंपन्याचे काम १५ ते २० टक्यांवरून वाढून ते ३५ ते ४० टक्यांपर्यंत जाईल. भारत मोबाइल निर्मिती क्षेत्रात दुसर्या क्रमांकावर आहे. पहिले स्थान मिळविण्यासाठी भारताची वाटचाल सुरू आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था