अहमद पटेल ईडीच्या जाळ्यात; १४,५०० कोटींच्या मनी लाँड्रींग प्रकरणी घरी जाऊन चौकशी

  •  भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलेला बडा मासा सापडला

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : विविध भ्रष्टाचारांच्या चौकशीचे शुक्लकाष्ट काँग्रेसच्या मागून सुटायला तयार नाही. पी. चिदंबरम यांच्या पाठोपाठ सोनिया गांधींचे निकटवर्ती अहमद पटेल ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. भष्टाचाराची दलदल मोदी सरकार उपसतेय. त्यात एका पेक्षा एक बडे मासे घावायला लागलेत.

संदेसरा ग्रुपच्या स्टर्लिंग बायोटेक कंपनीच्या १४,५०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रींग गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालय ईडीच्या तीन सदस्यांचे पथक अहमद पटेल यांच्या सेंट्रल दिल्लीमधील मदर तेरेसा क्रेसेंट या घरी पोहोचले. त्यांनी मनी लाँड्रिगच्या कायद्यातील तरतुदीप्रमाणे अहमद पटेलांचा जबाब घेतला आहे. यापूर्वी ईडीने दोनवेळा पटेलांना समन्स बजावले होते.

मात्र पटेल हे गुजरातमधून राज्यसभेचे खासदार असून ज्येष्ठ नागरिक असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना घराबाहेर पडणे शक्य नव्हते. तशी पटेलांची विनंती ईडीने मान्य केली होती. मात्र, चौकशी करण्यासाठी घरी तपास अधिकारी पाठवू, असे ईडीने पटेल यांना सांगितले होते. त्यानुसार पटेल यांचा जबाब नोंदविण्यात आला.

गुजरातच्या स्टर्लिंग बायोटेक कंपनीकडून कोट्यवधी रुपयांची बँकांची फसवणूक व मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात चेतन आणि नितीन संदेसरा बंधू आणि इतरांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी अहमद पटेलांचा संबंध असल्याचा ईडीला संशय आहे. मात्र, पी. चिंदबरम यांच्यानंतर आता पटेल भ्रष्टाचार प्रकरणात सापडल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

यापूर्वी चिंदबरम यांना तुरुंगांची हवा खावी लागली आहे. ते काही महिने ईडीच्या ताब्यात होते. अहमद पटेल हे काँग्रेसमध्ये सोनियांचे थिंक टँक मानले जातात. आता त्यांनाच ईडीने दणका दिल्याने कॉंग्रेसच्या अडचणीत भर पडणार आहे. स्टर्लिंग बायोटेक कर्जप्रकरणात मनी लॉड्रिंगच्या झालेल्या व्यवहाराची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी संदेसरा बंधू आणि अहमद पटेल यांचे संबंध लक्षात घेता ही चौकशी सुरू असल्याचेही समजते.

आधी अहमद पटेल यांचा मुलगा फैजल आणि जावई इरफान सिद्दीकी यांच्या चौकशीनंतर ईडीने आता खुद्द अहमद पटेलांची चौकशी सुरू केल्याने पटेलांसह काँग्रेसपुढच्या अडचणी वाढणार असल्याचेही बोलले जात आहे. पटेल यांचा मुलगा फैसल आणि जावई इरफान सिद्दीकी यांनी स्टर्लिंग गैरव्यवहारात मनी लॉंन्ड्रींग केल्याचा आरोप आहे. या दोघांची यापूर्वी चौकशी झाली आहे.

काय आहे स्टर्लिंग बायोटेक प्रकरण?

गुजरातमधील बडोदा येथील संदेसरा घराणे मोठे उद्योजक आहेत. या कंपनीचे मालक नितीन, दिप्ती संदेसरा यांनी १४,५०० कोटी रूपयांचे कर्ज बँकाकडून घेतले आहे. हे कर्ज घेताना त्यांनी बँकांना चुकीची माहिती देऊन हेराफेरी केली. हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर संदेसरा बंधू देश सोडून पळून गेले. सरकारने पळपुटे म्हणून जाहीरही केले आहे.

२०१७ मध्ये या प्रकरणाचा तपास सुरू झाला. याप्रकरणी अहमद पटेल यांचा मुलाची आणि जावयाची आतापर्यंत ईडीने तीन वेळा चौकशी केली आहे. या व्यवहार प्रकरणी अहमद पटेल यांच्याकडेही बोट दाखविले जात आहे. आता ईडी पुढे कोणते पाऊल उचलते हे पाहावे लागेल.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*