अयोध्येला सर्वधर्मसमभावाचे जगातील सर्वात मोठे प्रतिक बनविण्याची पंतप्रधानांकडून तयारी


भव्य राममंदिराबरोबरच अयोध्येमध्ये सांस्कृतिक नगरीही साकारणार आहे. बौध्द, जैन, इस्लाम आणि शिख धर्मस्थळांचा विकास करून गौरवशाली भारतीय परंपरेचे दर्शन घडविणारी सर्वोत्तम पर्यटन नगरी म्हणून अयोध्येची उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच वर्षे मुख्य सचिव म्हणून काम केलेले वरिष्ठ अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे या महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : भव्य राममंदिराबरोबरच अयोध्येमध्ये सांस्कृतिक नगरीही साकारणार आहे. बौध्द, जैन, इस्लाम आणि शिख धर्मस्थळांचा विकास करून गौरवशाली भारतीय परंपरेचे दर्शन घडविणारी सर्वोत्तम पर्यटन नगरी म्हणून अयोध्येची उभारणी करण्याचे काम सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाच वर्षे मुख्य सचिव म्हणून काम केलेले वरिष्ठ अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे या महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या सूचनेनुसारच मिश्रा यांनी अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीच्या तयारीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मंदिराचे डिझाईन आणि मॉडेल एकमताने तयार केले जावे, असे आवाहन त्यांनी केले. ट्रस्टने पुढील बैठकीत भूमिपूजनाची तारीख निश्चित करून पंतप्रधानांना निमंत्रण पाठवावे असेही या बैठकीत ठरले.

मिश्रा यांनी सांगितले की पंतप्रधान राममंदिराबरोबरच परिसरातील ७० एकरावरील विकास योजनेचीही पाहणी करणार आहेत. सर्वधर्मसमभावाचे जगातील सर्वात मोठे प्रतिक अयोध्यानगरी बनावे, अशी पंतप्रधानांची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.

अयोध्येतील सांस्कृतिक विकास योजनेसाठी संस्कृती मंत्रालयाने एक अहवाल तयार केला आहे. तो देखील पंतप्रधान पाहणार आहेत. या अहवालानुसार प्राचीन अयोध्येचे जगातील १२० देशांशी संबंध असल्याचे दिसून आले आहे. इंडोनेशिया या मुस्लिम देशातील लोक स्वत:ला श्रीराम यांचे वंशज मानतात. कोरियाची राणी ही अयोध्येची राजकुमारी होती. त्यांना नमन करण्यासाठी दरवर्षी कोरियन राजघराण्यातील लोक अयोध्येला भेट देण्यासाठी येत असतात.

मुस्लिमांसाठीही अयोध्येचे धार्मिक महत्व आहे कारण येथे पैगंबर शीश, हजरत नूह आणि अनेक सूफी संतांचे वास्तव्य राहिले आहे. जैन धर्माचे सगळे २४ तीर्थंकर श्रीरामांचे वंशज असल्याचे मानले जाते. शिख धर्माचे पहिले गुरू नानकदेव, नववे गुरू तेग बहादूर आणि १० वे गुरू गोविंद सिंह यांनी येथील गुरूद्वारा ब्रम्हकुंड मध्ये ध्यान केले होते.

सर्वच धर्मियांचे अयोध्येशी धार्मिक ऋणानुबंध असल्याने सर्वधर्मियांसाठी ही नगरी पुजनिय व्हावी यासाठी पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. प्रत्येक धर्माचे एक पवित्र स्थळ येथे उभारले जाणार आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था