अमृता फडणवीस यांंच्या प्रश्नावर सरकार निरुत्तर, ट्रोलधाडांची फौज मात्र सुसाट


महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून सरकारला प्रश्न विचारणेही आता ट्रोलधाडांच्या फौजेमुळे अवघड झाले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणावरून अमृता फडणवीस यांनी सरकारला प्रश्न विचारला. त्यावर सरकार निरुत्तर झाले, मात्र ट्रोलधाडांची फौज सुसाट झाली असून त्यांना उत्तर देऊ लागली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील एक नागरिक म्हणून सरकारला प्रश्न विचारणेही आता ट्रोलधाडांच्या फौजेमुळे अवघड झाले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरे-अजित पवार सरकारला प्रश्न विचारला. त्यावर सरकार निरुत्तर झाले, मात्र ट्रोलधाडांची फौज सुसाट झाली असून त्यांना उत्तर देऊ लागली आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांची प्रतिमा स्वतंत्र विचाराची आधुनिक स्त्री अशी आहे.
अमृता फडणवीस यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने हाताळला जात आहे, त्यावरून मला असे वाटते की मुंबईने माणुसकीच गमावली आहे. निष्पाप आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणे अजिबात सुरक्षित राहिलेले नाही. यात सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सॅलियनला न्याय मिळायला हवा असे हॅशटॅगही टाकले.

मात्र, त्यांच्या या ट्विटवर उत्तर देण्याऐवजी ट्रोलधाडांनी त्यांनाच ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. युवासेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई यांनी उत्तर दिले. ‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता? सोडून द्या, सुरक्षा कवच भरोसा नसेल तर !!’ असे ट्विट सरदेसाई यांनी केले.

शिवसेनेच्या सोशल मीडियातील पाठिराख्यांनी फडणवीस यांच्यावर हल्ला चढवत पोलिस कार्यक्रमातील अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा मुद्दा पुढे करत त्यांच्यावर टीकेचे भडीमार केला.

फडणवीस यांच्या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांवर आरोप सोडा साधा त्यांचा उल्लेखही नाही. मग, शिवसेनेला इतक्या मिरच्या का झोंबतायत, असा प्रश्न फडणवीस यांच्या पाठिराख्यांनी उपस्थित केला. दरम्यान, याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले,

“अमृता फडणवीस यांनी केलेले ट्वीट सुशांत सिंह यांच्याविषयी आहे. या ट्विटचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये. मुंबई सुरक्षित आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. परंतू, सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी जनतेला उत्तर हवे.”

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती