अमृता फडणवीसांना ट्रोल करणाऱ्या वरुण सरदेसाईवर संतापले नारायण राणे, म्हणाले तोंड सांभाळून बोल


माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ट्रोल करणारा युवासेनेचा नेता वरुण सरदेसाई याला नारायण राणे यांनी चांगलेच फटकारले आहे. तोंड सांभाळून बोल, असा इशारा राणे यांनी दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ट्रोल करणारा युवासेनेचा नेता वरुण सरदेसाई याला नारायण राणे यांनी चांगलेच फटकारले आहे. तोंड सांभाळून बोल असा इशारा राणे यांनी दिला आहे.

प्रसिध्द अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून अमृता फडणवीस यांनी ट्विट केले होते. त्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या की, ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळले जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही.

त्यावर युवा सेनेचा नेता वरुण सरदेसाई म्हणाला होता की, मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांची सिक्योरिटी कव्हर घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता ?? सोडून द्या की सिक्योरिटी कव्हर भरोसा नसेल तर !!’

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी यावरून वरुणला फटकारले आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, तू लहान आहेस. तोंड बंद करण्याचा उपाय आमच्याकडे आहे. त्यामुळे तोंड सांभाळून बोल. शिवसेनेचा अन्याय पाहून सगळे गेलेत.

शिवसेनेत आता नवे कलेक्टर ऑफिसर आले आहेत. त्यांच्या कुंडल्या आम्हाला माहिती आहेत. ते कुठे जातात, काय करतात, कुणाशी बोलतात, कुणाशी तडजोड करतात, ते सर्व आम्हाला माहिती आहे. वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीसांवर ज्या शब्दात टीका केली, त्याबद्दल त्यांनी माफी मागावी.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था