अभिजित मुहूर्तावर पूर्ण समर्पणाद्वारे राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न


  • रामलल्लाला मोदींचा साष्टांग नमस्कार, त्यांचे दर्शन घेणारे पहिले पंतप्रधान; ३१ वर्षे जुन्या शिलांचे केले
  • मंदिराच्या पायाभरणीत ९ चांदीच्या विटा लावण्यात आल्या

वृत्तसंस्था

अयोध्या : अयोध्येत आज इतिहास घडला. दुपारी १२.४४ ८ सेकंदावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम जन्मभूमी मंदिराचे अभिमंत्रासहित भूमिपूजन संपन्न झाले.

मंदिराच्या भूमिपूजनाचा पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यजमानांच्या नावाने “राष्ट्रकल्याणार्थं राम मंदिर निर्माण करिष्ये”, असा करण्यात आला. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पूजन धर्मविधीस्थळी उपस्थित होते.

तत्पूर्वी, मोदींनी चांदीच्या ९शिलांचे पूजन केले. दुपारी १२ वाजून ४४ मिनिट ८ सेंकदाच्या शुभ मुहूर्तावर पायाभरणी केली. एकूण 32 सेकंदचा हा अभिजित शुभ मुहूर्त होता. तो अचूक साधण्यात आला.

तत्पूर्वी त्यांनी हनुमानगढीमध्ये दर्शन घेतले आणि पूजा केली. यानंतर त्यांनी रामजन्मभूमीत साष्टांग नमस्कार घालत रामलल्लांचे दर्शन घेतले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलालचे दर्शन घेणारे आणि हनुमान गढीला जाणारे पहिले पंतप्रधान ठरले. मोदी आणि भाजपने १० पैकी ८ लोकसभा निवडणुकांत राम मंदिर उभारण्याचे आश्वानस दिले होते. …आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे भूमिपूजनाचे पहिले आमंत्रण बाबरी मशिदीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांना पाठवले होते.

४९२ वर्षांपूर्वी बाबरच्या आदेशानुसार अयोध्येत वादग्रस्त रचना बांधली गेली. १८८५ मध्ये पहिल्यांदा हे प्रकरण न्यायालयात गेले. २०१९ मध्ये सुप्रीम कोर्टाने रामललाच्या बाजुने निकाल दिला. याच्या ठीक नऊ महिन्यांनंतर अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे.

स्वातंत्र्यानंतर मोदी हे एकमेव पंतप्रधान असतील जे हे पद सांभाळताना रामललाच्या दरबारात असतील. त्यांच्या अगोदर इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी स्वत: पंतप्रधान म्हणून अयोध्येत पोहोचले, पण ते रामललाचे दर्शन घेऊ शकले नाही.

मोदी २९ वर्षांनंतर अयोध्येत

यापूर्वी मोदी 1991 मध्ये अयोध्येत गेले होते. तेव्हा भाजपाचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी तिरंगा यात्रा काढत होते आणि त्या यात्रेत मोदी त्यांच्यासोबत होते. मोदींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी फैजाबाद-आंबेडकर नगरमध्ये एका सभेला संबोधित केले होते मात्र ते अयोध्येत गेले नाहीत.

आज मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलाल्लाचे दर्शन घेतले. अयोध्येत पोहोचल्यावर सीएम योगींनी हेलिपॅडवर पंतप्रधान मोदींचे अभिवादन केले.

माजी केंद्रिय मंत्री उमा भारती देखील कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. त्यांनी ट्विट करून सांगितले की, त्यांना राम जन्मभूमी न्यासाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले. याआधी आपण शिलान्यास दरम्यान शरयू किनारी राहणार असल्याचे म्हटले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी वायुसेनेच्या विमानाने लखनौत पोहचले. येथून ते हेलिकॉप्टरने अयोध्येसाठी रवाना झाले.

अयोध्येत पोहोचलेले रामदेव बाबा म्हणाले, आज ऐतिहासिक दिवस आहे. आजचा दिवस दीर्घकाळ आठवणीत ठेवला जाईल. देशात रामराज्याची स्थापना होईल.

हनुमानगढीचे मुख्य पुजारी प्रेमदास महाराज म्हणाले की, आज गर्वाचा क्षण आहे. “आम्ही पंतप्रधान मोदी यांना पगडी आणि रामनामी देऊन सन्मान करणार. त्यांना चांदीचे नाणेही देणार आहोत.”

पंतप्रधान मोदी धोती आणि सोनेरी कुर्ता परिधान करुन अयोध्येत पोहोचले, राममय झाले शहर, उत्सावाचे वातावरण आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था