अडवाणीच्या रथयात्रेच्या स्वागतावरून भाजप-सेनेत जुंपली


विशेष प्रतिनिधी

नाशिक : अयोध्येत श्रीराम मंदीराच्या भूमिपूजनानिमित्त कारसेवा आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेच्या आठवणींना उजाळा मिळाला. पण या रथयात्रेवरून जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत पुराव्यांचा राजकीय धुरळा उडाला आहे. त्यात आता थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुलाखतीवरून त्यांच्या सहभागाच्या पुराव्याबाबत शिवसेनेचे कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करत आहेत.

कामाला कधीतरी आणि श्रेय घ्यायला सर्वात आधी अशी सध्या शिवसेनेची अवस्था झाली आहे. शिवसेना राज्यात महाआघाडीतील एक घटक आहे. त्यांचेच सरकार आहे, पण सर्व प्रश्न सोडविण्यात ठाकरे सरकारला अपयश आले आहे. राज्याचे नियोजन करायचे सोडून त्याचे कार्यकर्ते,पदाधिकारी यांनाही दुसऱ्याच विषयात रस असल्याचे दिसते.

श्रीरामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनानिमित्त जिल्ह्यात अनेकांनी आठवणी सांगितल्या. त्यात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे लालकृष्ण अडवानी यांच्या रथयात्रेचे स्वागत केले, आपलाही या रथयात्रेत सहभाग असल्याचे सांगितले.त्यावर भाजपचे माजी नगरसेवक उदय भालेराव यांनी प्रश्न उपस्थित करत लालकृष्ण अडवानी यांची श्रीराम रथयात्रा जळगावात आलीच नव्हती असा दावा करत अडवानी जेव्हा जेव्हा जळगाव जिल्ह्या आले व पाळदी येथे रथयात्रेत आलेच नव्हते,अशी माहितीही सोशल मिडीयावर अपलोड करून टाकली व गुलाबराव पाटील ठोकून देतात असे म्हटले.

शिवसैनिक संतप्त

जळगावचे शिवसेनेचे जळगावातील नगरसेवक प्रशांत नाईक यांनी थेट पाळधी येथे लालकृष्ण अडवानी यांची रथयात्रा आल्याचे फोटोसह पुरावेच दिले. तसेच पाळधी येथील भाजप कार्यकर्ते सुनिल झंवर यांची या यात्रेसाठी गुलाबराव पाटील यांना मदत झाल्याची व्हिडीओ क्लिपही प्रसिध्द केली मात्र आता या रथयात्रेवरूनही चर्चा सुरु झाली आहे. प्रसिध्द झालेल्या फोटोत अडवानी यांच्या रथयात्रेवर सुराज्य रथयात्रा असे नाव आहे. यात्रेत वेंकय्या नायडू,भाजपचे नेते एकनाथ खडसे,माजी आमदार बी.एस.पाटील दिसत आहेत.

फडकेंनी मांडली वस्तुस्थिती

याबाबत भाजपचे नेते व बेटी बचाव बेटी पढावचे संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी सांगितले की, ही रथयात्रा श्रीराम रथयात्रा नव्हे तर अडवानी यांनी नंतर काढलेली सुराज्य रथयात्रा असल्याचे स्पष्ट केले. रथयात्रेच्या पुराव्याचा धुराळा एवढ्यावरच थांबला नाही तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट खडसे आणि फडणवीसांच्या सहभागाच्या पुराव्यापर्यत वाद सुरु केला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती