वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल करून अर्णब गोस्वामींना छळण्याची कॉँग्रेसची खेळी


कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टिपणीसाठी अर्णब गोस्वामी यांच्यावर वेगवेगळ्या राज्यात गुन्हे दाखल होत आहे. या निमित्ताने त्यांना ठिकठिकाणच्या न्यायालयांमध्ये हेलपाटा घालून छळण्याची खेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, सहिष्णुता आदीची जपमाळ ओढणार्‍या कॉंग्रेसने केली आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टिपणीसाठी अर्णब गोस्वामी यांच्यावर वेगवेगळ्या राज्यात गुन्हे दाखल होत आहे. या निमित्ताने त्यांना ठिकठिंकाणच्या न्यायालयांमध्ये हेलपाटा घालून छळण्याची खेळी कॉँग्रेसने केली आहे.

गोस्वामी यांच्यावर पहिला गुन्हा महाराष्ट्रातील नागपूरमध्ये उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला. त्यानंतर छत्तीसगडच्या रायपूर जिल्ह्यातील पोलिसांनी काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीवरून रिपब्लिकन टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले. पुणे, मुंबई या शहरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले.

रायपूर जिल्ह्याच्या पोलिस अधिकार्‍यानी सांगितले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन मरकाम आणि राज्याचे आरोग्य मंत्री टीएस सिंहदेव यांनी अर्णब गोस्वामीवर पालघर प्रकरणात आपल्या वक्तव्याने देशातील जनतेला भडकवण्याचा आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका करण्याचा आरोप केला आहे. कोरोना विषाणू विषयी पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या सूचना चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप काँग्रेस नेते गिरीश दुबे यांनी केला आहे.

अर्णब गोस्वामी यांनी मंगळवारी पालघरमध्ये जमावाने साधूंची हत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या वाहिनीवर ‘पूछता है भारत’ नावाचा चर्चासत्र कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमात अर्णब गोस्वामी यांनी आपल्या वक्तव्याने देशातील जनतेच्या सद्भावाला समुदायाच्या आधारावर भडकवले. तसेच देशातील विविध समुदायांमध्ये द्वेषाचे वातावरण निर्माण केले. त्यांनी सांगितले की, काँग्रेस नेत्यांनी तक्रार केली की, या कार्यक्रमादरम्यान गोस्वामी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर चुकीचे भाष्य केले.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात