मुंबई पोलिसांसाठी प्रसूती ही आपतकालीन सेवा नाही…??


अभिनेता रणवीर शौरीला आला अनुभव


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘महिलेची प्रसूती ही मुंबई पोलिस आपतकालीन वैद्यकीय सेवा नसल्याचा अनुभव बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीला आला. त्याने त्याच्या घरी काम करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पत्नीला प्रसूतीसाठी नेण्या – आणण्यासाठी कार दिली पण ती कार पोलिसांनी जप्त करून एफआयआर नोंदवला. रणवीरने ट्विट मागून ट्विट करून ही कहाणी शेअर केली.

रणवीरने मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करत तक्रार केली आहे. या तक्रारीत त्याने म्हटले आहे की, आपत्कालीन घरगुती कामासाठी वापरली जाणारी माझी कार मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतली. या ट्विटच्या माध्यमातून त्यान् पोलिसांना प्रसुती ही आपत्कालीन परिस्थिती नाही का, असा प्रश्न विचारला आहे.

गाडी जप्त केली तेव्हा रणवीर हा कारमध्ये नव्हता. त्यांच्या घरात काम करणारा नोकर त्या गाडीत होता. रणवीरने ट्विटमध्ये म्हटले की, “माझ्या घरात काम करणार्‍याची बायको तीन दिवसांपूर्वी प्रसूत झाली. तिच्यासाठी तीन दिवसांपूर्वी मी महिंद्रा एसयूव्ही ही कार त्याला दिली होती. जवळपास तीन दिवनसांनंतर ते त्याच कारने घरी येत होता. तेव्हा त्याची कार अडवून जप्त केली.”

“मी ही परिस्थिती सांगितली तरी जोगेश्वरी महामार्ग पोलिस चौकीतले विजय कदम यांनी एफआयआर दाखल करून कार ताब्यात घेतली. इतर अधिकारी परिस्थिती समजून घेऊन सहानुभूती दर्शवतात. पण विजय कदम यांनी एफआयआर दाखल करत कार जप्त केली.” कोणत्याही प्रसूती केसला आपत्कालीन सेवा समजायला नको का, असा सवाल रणवीरने केला आहे.

रणवीरच्या ट्विटनंतर पोलिसांनी त्याला ट्विटरद्वारे उत्तर दिलं. पोलिसांच्या पोस्टमध्ये म्हटलं की, सर, आम्ही तुम्हाला फॉलो करतो. तुम्ही तुमचा नंबर आम्हाला डायरेक्ट मेसेज करा.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात