पंतप्रधान म्हणाले, दहशतवाद आणि खोट्या वृत्तांसारख्या विषाणूंचेही आव्हान


जग चीनी व्हायरसशी लढत असतानाही, काही लोक इतर प्राणघातक विषाणू पसरवण्यात व्यस्त आहेत. उदा. दहशतवाद, खोट्या बातम्या आणि समाज तसेच देशांमध्ये फाळणी करण्यासाठी तयार केलेले व्हिडिओ. या विषाणूंविरोधातही जगाने सातत्याने लढा द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जग चीनी व्हायरसशी लढत असतानाही, काही लोक इतर प्राणघातक विषाणू पसरवण्यात व्यस्त आहेत. उदा. दहशतवाद, खोट्या बातम्या आणि समाज तसेच देशांमध्ये फाळणी करण्यासाठी तयार केलेले व्हिडिओ. या विषाणूंविरोधातही जगाने सातत्याने लढा द्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

अलिप्त राष्ट्र चळवळ सदस्य गटाच्या (नाम) ऑनलाईन शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. सध्या सुरु असलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारत चीनी व्हायसच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांची मोदींनी माहिती दिली.

‘कोविड-19 विरोधात एकजूट या शिखर परिषदेच्या संकल्पनेला आणखी पुढे नेत परस्पर सहकार्याचे नवे पर्व सुरू करण्याचे आवाहन मोदींनी केले. नामचे अध्यक्ष आणि अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इलहाम अलीयेव यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेतल्या सहभागाने, नामचा एक आघाडीचा संस्थापक सदस्य म्हणून नामची तत्वे आणि मूल्यांप्रति भारताची श्रध्दा पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

पंतप्रधान म्हणाले, आज मानवतेला अनेक दशकांमधील सर्वात गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे. यावेळी, अलिप्त राष्ट्रगट चळवळ (नाम) जागतिक एकता वाढवण्यात मदत करू शकते. अलिप्त राष्ट्रगट चळवळ नेहमीच जगाचा नैतिक आवाज राहिला आहे. ही भूमिका कायम ठेवण्यासाठी एनएएमला सर्वसमावेशक राहायला हवे. एकूण लोकसंख्येच्या एक षष्ठांश लोक भारतात राहतात.

भारत हा विकसनशील देश आणि मुक्त समाज आहे. या संकटकाळात, आम्ही दाखवून दिले आहे की लोकशाही, शिस्त आणि निर्णयक्षमता एकत्र येऊन लोकांची खरी चळवळ कशी निर्माण केल्या जाते. भारताची संस्कृती संपूर्ण जगाकडे एक कुटुंब म्हणून पाहते. आम्ही आमच्या स्वत:च्या नागरिकांची काळजी घेत आहोत, त्याचप्रमाणे आम्ही इतर देशांना देखील मदत करत आहोत. कआम्ही अनेक देशांबरोबर भारताचे वैद्यकीय कौशल्य सामायिक करण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करत आहोत. परवडणाºया औषधांसाठी जगातील एक फार्मसी म्हणून भारताकडे पाहिले जाते.

आमच्या स्वत:च्या गरजा असूनही जगातील 123 पेक्षा अधिक देशांना वैद्यकीय वस्तूंचा पुरवठा केला असल्याचे सांगुन मोदी म्हणाले, आम्ही लस विकसित करण्याच्या जागतिक प्रयत्नात सक्रिय आहोत. भारतात जगातील सर्वात प्राचीन वनौषधी -आधारित पारंपारिक औषध प्रणाली आहे. लोकांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवायला मदत करण्यासाठी आम्ही सोपे आयुर्वेदिक घरगुती उपचार सर्वांसाठी उपलब्ध करत आहोत.या आरोग्य संकटाशी लढण्यासाठी जगाला मदत करण्यासाठी आम्ही एक चळवळ म्हणून एकत्र काय करू शकतो, याचा विचार करायला हवी.

पंतप्रधान म्हणाले, चीनी व्हायरसच्या संकटाने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेची मर्यादा दाखवली आहे. यापुढील काळात जगात आपल्याला निष्पक्षता, समानता आणि मानवतेवर आधारित जागतिकीकरणाच्या नवीन रचनेची आवश्यकता आहे. जगाचे प्रतिनिधित्व करू शकतील अशा आंतरराष्ट्रीय संस्थांची आवश्यकता आहे. आपल्याला केवळ आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करायचे नाही तर मानवी कल्याणासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

संपूर्ण मानव जातीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन, आपल्या पृथ्वीला हवामान बदलांच्या आजारापासून बरे करण्यास मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी , हवामान आणि आपत्तीच्या जोखमीपासून आपले रक्षण करण्यासाठी आपत्तिरोधक संरचना आघाडी उभारायला हवी. बरेच देश लष्करी कवायती आयोजित करतात. परंतु भारताने आपल्या प्रदेशात आणि त्याही पलीकडे आपत्ती व्यवस्थापन कवायती आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात