पंतप्रधानांनी सांगितला स्वावलंबनाचा मंत्र, चीनी व्हायरसपासून घ्या धडा


चीनी व्हायरससारख्या संकटाचा सामना करण्यासाठी आता आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल. त्यामुळेच संकटाचा सामना करणे कठीण होईल. पंचायत, जिल्हे आणि राज्ये स्वावलंबी बनली पाहिजेत. आपल्या गरजांसाठी बाहेरील लोकांवर अवलंबून राहावे लागणार नाही,असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सरपंचांना केले.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरससारख्या संकटाचा सामना करण्यासाठी आता आपल्याला स्वावलंबी व्हावे लागेल. त्यामुळेच संकटाचा सामना करणे कठीण होईल. पंचायत, जिल्हे आणि राज्ये स्वावलंबी बनली पाहिजेत. आपल्या गरजांसाठी बाहेरील लोकांवर अवलंबून राहावे लागणार नाही,असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सरपंचांना केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय पंचायत राज दिनाच्या निमित्ताने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व सरपंचांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी ई-स्वराज पोर्टल आणि ई-ग्राम स्वराज अ‍ॅप लॉं केले. यामध्ये पंचायतीशी संबंधित माहिती उपलब्ध असणार आहे.

मोदी म्हणाले की, कोरोनाव्हायरसमुळे आपल्यासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. देशाला आता स्वावलंबी व्हावे लागेल असा धडा देखील या महामारीने दिला आहे.

पंतप्रधान म्हणाले, आजाराने अनेक नवीन आव्हाने व कल्पनाही केली नव्हती अशा समस्या उभ्या केल्या, मात्र आपल्याला सर्वांना एक नवा संदेशही दिला- आपण स्वयंपूर्ण आणि स्वयंसिद्ध झालेच पाहिजे. प्रश्नांची उत्तरे देशाबाहेर शोधता कामा नये, हा सर्वात मोठा धडा आपण शिकलो आहोत.

प्रत्येक गाव आपल्या मूलभूत गरज भागविण्याइतके स्वयंपूर्ण असलेच पाहिजे.प्रत्येक जिल्हा, त्याच्या पातळीपर्यंत स्वयंपूर्ण असला पाहिजे. प्रत्येक राज्य स्वयंसिद्ध असले पाहिजे आणि सारा देशही त्याच्या पातळीवर स्वयंसिद्ध असला पाहिजे”, असे ते म्हणाले.

“गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आणि ग्रामपंचायतींना बळकट करण्यासाठी सरकारने कसून केले आहेत. गेल्या पाच वर्षात जवळपास 1.25 लाख ग्राम पंचायती ब्रॉडबँड सुविधेने जोडल्या गेल्या आहेत, पूर्वी हाच आकडा जेमतेम शंभर होता. तसेच, सामायिक सेवा केंद्रांची संख्याही 3 लाखापलीकडे गेली आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.

मोबाईल फोन्सचे उत्पादन भारतात होत असल्याने, स्मार्टफोनच्या किंमती उतरल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक खेड्यात स्वस्त स्मार्टफोन पोहोचले आहेत. यातून, पुढे, गावपातळीवर डिजिटल पायाभूत सुविधा आणखी भक्कम होऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

व्यक्ती-व्यक्तींमधील उचित सामाजिक अंतर स्पष्ट करून सांगणारा- ‘दो गज दूरी’ म्हणजे ‘दोन हातांचे अंतर’ हा साधासोपा मूलमंत्र सांगितल्याबद्दल, पंतप्रधानांनी सरपंचांशी बोलताना खेडेगावांचे कौतुक केले. ग्रामीण भारताने दिलेले दो गज देह की दूरी म्हणजे,

दोन हात अंतरावर थांबणे हे घोषवाक्य म्हणजे, लोकांच्या शहाणपणाचे व चतुराईचे द्योतक आहे. अशा शब्दात त्यांनी या घोषवाक्याचे कौतुक केले. या वाक्यामुळे लोकांना सामाजिक अंतर राखण्याची प्रेरणा मिळते, असेही ते म्हणाले.

भारताकडे मर्यादित साधने असूनही, भारताने हे आव्हान वेळेपूर्वीच चाणाक्षपणे कृती करून समर्थपणे पेलले आहे. सगळे प्रयत्न सुरु असताना, आपण याचेही भान ठेवले पाहिजे की, कोणा एकाच्या चुकीमुळे सारे गाव धोक्यात येऊ शकते. म्हणूनच प्रयत्नात शिथिलता येऊन चालण्यासारखे नाही, असा संदेशही पंतप्रधानांनी दिला.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात