करुणा आणि सेवाभावाने आव्हानांवर मात; बुध्द पौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांचा संदेश


भारत कठीण काळात जगाच्या सोबत आहे. इतरांसाठी मनात करूणा, संवेदनशीलता आणि सेवाभाव तर कितीही मोठ्या आव्हानावर आपण मात करू शकतो. आज संपूर्ण जग संकटातून जात आहे. भारत या वेळी विश्वहितासाठी काम करत आहे आणि नेहमीच करत राहील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत कठीण काळात जगाच्या सोबत आहे. इतरांसाठी मनात करूणा, संवेदनशीलता आणि सेवाभाव तर कितीही मोठ्या आव्हानावर आपण मात करू शकतो. आज संपूर्ण जग संकटातून जात आहे. भारत या वेळी विश्वहितासाठी काम करत आहे आणि नेहमीच करत राहील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

बुद्ध पौर्णिमेच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले. या वेळी बोलताना मोदी म्हणाले की, अशा वेळी जेव्हा जगात उलथापालथ आहे. बर्याच वेळा दु:ख, निराशेचे मळभ साठत आहे. या परिस्थितीत भगवान गौतम बुध्द यांचा करुणा आणि सेवाभावाचा संदेश मानवजातीसाठी खूप महत्वाचा आहे. आजच्या काळातही भगवान बुध्दांचे विचार आपल्याला दु:खाविरुध्द लढण्यासाठी प्रेरित करतात. काळ बदलला, स्थिती बदलली, समाजातील व्यवस्था बदलल्या मात्र भगवान बुद्धांचा संदेश आपल्या जीवनात कायम राहिला आहे.

“बुद्ध हे केवळ नावच नाही तर पवित्र विचार देखील आहेत. बुद्ध त्याग आणि तपस्येची सीमा आहे. बुद्ध सेवा आणि समर्पणाचे नाव आहे. भगवान बुद्धांचे प्रत्येक वचन, उपदेश मानवतेची सेवा करणे हेच आपले कर्तव्य असल्याचे सांगतो,” असे मोदी म्हणाले. त्यांनी सांगितले की, सेवा करणार्या प्रत्येक व्यक्तीला मी नमन करतो. जे मानवतेची सेवा करतात तेच बुद्धाचे खरे अनुयायी असतात.

मोदी म्हणाले, “बुद्ध म्हणायचे की थकून थांबणे, हा पर्याय नाही. मनुष्याने सतत कठीण परिस्थितींवर विजय मिळविण्याचा त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण सर्वजण या कठीण परिस्थीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही तुमच्या कुटुंबाची आणि आरोग्याची काळजी घ्या, आपले संरक्षण करा, तसेच दुसर्यांनाही मदत करा.” भगवान बुद्धांनी भारताच्या संस्कृतीला समृद्ध केले असल्याचे सांगुन पंतप्रधान म्हणाले, जीवनातील अडचणी दूर करण्याचा संदेश व संकल्प यांनी भारताच्या सभ्यता आणि संस्कृतीला नेहमीच दिशा दाखविली आहे. भारताच्या या संस्कृतीला आणखीनच समृद्ध केले आहे. आपल्या जीवन प्रवासातून इतरांच्या आयुष्य प्रकाशमय केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात