उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच; जळगाव जिल्ह्यात ११ नवे पॉझिटिव्ह


विशेष प्रतिनिधी

जळगाव : उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा कहर थांबायचे नाव घेत नाहीए. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे नवे ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जळगाव, अमळनेर, भुसावळ येथे स्वॅब घेण्यात आलेल्या 70 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 59 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर अकरा व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये अमळनेर येथील एक 58 वर्षीय महिला, भुसावळ येथील चार ( 32, 50, 52, 64 वर्षीय) पुरूषांचा तर जळगाव शहरातील पवननगर व इतर भागातील सहा (यामध्ये 14 वर्षीय मुलगी, 38, 55, 70 वर्षीय महिलांचा तर 46 व 70 वर्षीय पुरूषांचा) व्यक्तींचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित रूग्णांची संख्या 174 झाली आहे. यापैकी 20 रूग्णाचा मृत्यू झाला आहे तर तीन व्यक्ती करोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात