कोठारी बंधूंच्या बलिदानाचे स्मरण; बहीण राहणार भूमिपूजनाला उपस्थित


विशेष प्रतिनिधी 

अयोध्या : १९९० च्या कारसेवेत बलिदान करणाऱ्या कोठारी बंधूंच्या बलिदानाचे स्मरण राम जन्मभूमी मंदिर ट्रस्टने ठेवून कोठारी कुटुंबीयांना निमंत्रण दिले आहे. कोठारी बंधूंची बहीण पौर्णिमा दोन बंधूंच्या प्रतिमा घेऊन राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित राहणार आहे.

३० ऑक्टोबर १९९० रोजी “मुल्ला मुलायमने” नि:शस्त्र कारसेवकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. यात १२०० कारसेवकांचा मृत्यू झाला. शरयू नदीवरचा पूल आणि शरयू कारसेवकांच्या रक्ताने लाल झाली. पोलिसांनी लाठीमार, अश्रूधूर यांचा वापर करून कारसेवकांवर अनन्वित अत्याचार केले. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोकजी सिंघल लाठीमारात जखमी झाले. हजारो कारसेवक जखमी झाले. पण देशभर रान पेटले.

कोठारी बंधूंच्या बलिदानातून लाखो कारसेवकांनी प्रेरणा घेऊन ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवा करून बाबरी ढाचा पाडला. देशावरचा कलंक मिटवला.

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वेळी कोठारी बंधूंच्या बलिदानाचे स्मरण येणे स्वाभाविक आहे. एकीकडे काही पक्ष श्रेयवादाची लढाई लढत असताना प्रत्यक्ष बलिदान करणाऱ्यांचे स्मरण होणे आवश्यक आहे. कोब बंधूंच्या निमित्ताने ते होते आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था