संविधानाच्या मूळ प्रतीमधले राम, सीता आणि लक्ष्मणाचे चित्र; कायदा मंत्र्यांनी केले शेअर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा उत्साह सोशल नेटवर्किंगवरही दिसला. ट्विटवरील सर्वच्या सर्व टॉप ११ ट्रेण्ड हे अयोध्या राम मंदिरासंदर्भातील आहे. अनेक नेत्यांनी आणि मान्यवरांनीही यासंदर्भातील ट्विट केले आहेत. 

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनीही एक खास फोटो ट्विट केला आहे. प्रसाद यांनी ट्विट केलेला फोटो हा संविधानाच्या मूळ प्रतीमधील एका पानाचा असून त्यावर भगवान राम आणि सीता मातेबरोबरच लक्ष्मणाचे चित्र असल्याचे प्रसाद यांनी लक्षात आणून दिलं आहे.

“भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीवर मूलभूत अधिकारांसंदर्भातील कायद्यांबद्दलचा उल्लेख असणाऱ्या भागाच्या सुरुवातील एक चित्र आहे. यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम भवगान श्रीराम, सीता माता आणि भगवान राम यांचे बंधू लक्ष्मण दिसत आहेत.

रावणावर विजय मिळवून अयोध्येमध्ये परत येतानाचे हे दृष्य आहे. आज संविधानाची ही मूळ भावना मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे,” अशा कॅप्शनसहीत रवी शंकर प्रसाद यांनी हा फोटो शेअर केला आहे.

पेशाने वकील असणाऱ्या रवी शंकर प्रसाद यांनी बाबरी आणि रामजन्मभूमी खटल्यामध्ये काही काळ रामलल्लाची बाजू न्यायालयासमोर मांडली होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती