राम मंदिर हे रामराज्यावर आधारलेल्या आधुनिक भारताचं प्रतिक ठरेल


  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा विश्वास

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर हे रामराज्य संकल्पनेवर आधारलेल्या आधुनिक भारताचे प्रतिक ठरेल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला.

राम मंदिर भूमिपूजनाचा आज अखेर तो दिवस आला आणि या ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली. या भव्य दिव्य अशा कार्यक्रमामध्ये अनेक नेतेमंडळी संतमहंत याठिकाणी उपस्थित आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात राम मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी पंतप्रधानांसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि सरसंघचालक मोहन भागवत हे देखील उपस्थित होते.

 

 

यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ‘राम मंदिर उभारणीच्या सर्वांना शुभेच्छा… प्रभू राम यांच्या मंदिर उभारणीचं कार्य सर्व प्रकारच्या न्यायप्रक्रिया, सार्वजनिक आणि सामाजिक समरसतेच्या दृष्टीने होत असल्याचं ते म्हणाले. 

शिवाय राम मंदिर रामराज्यावर आधारलेल्या आधुनिक भारताचं प्रतिक असेल, असा विश्वास देखील त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती