मोदींचा २९ वर्षांपूर्वीचा राम मंदिराचा संकल्प; ज्येष्ठ पत्रकार महेंद्र त्रिपाठींची माहिती


वृत्तसंस्था

अयोध्या : नरेंद्र मोदी २९ वर्षांपूर्वी अयोध्येला आले होते. त्याचवेळी त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार महेंद्र त्रिपाठी यांनी दिली आहे. महेंद्र त्रिपाठी यांच्याकडे त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी अयोध्येला भेट दिल्याचा फोटो देखील उपलब्ध आहे.

याबाबत बोलताना महेंद्र त्रिपाठी म्हणाले की, ‘२९ वर्षांपूवी नरेंद्र मोदी अयोध्येला आले होते. त्यावेळी मी त्यांना प्रश्न विचारला होता की, आता अयोध्येला तुम्ही पुन्हा कधी भेट देणार आहात? त्यावेळी मोदी म्हणाले होते की, ‘राम मंदिर बनविल्यानंतरच मी अयोध्येला येईन आणि हा संकल्प आता ते पंतप्रधानपदावर आल्यानंतर प्रत्यक्षात उतरत आहे. याचा मी स्वतः पुरावा आहे.

१९९१ साली नरेंद्र मोदी डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासमवेत अयोध्येत आले होते. त्यावेळी त्यांना फारसे कोणी ओळखत नव्हते. त्यावेळी ते सतत मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत दिसत होते. त्यावेळी त्यांचे व्यक्तीमत्वदेखील छान होते.

मी त्यांच्याबाबत चौकशी केली असता मला माहिती मिळाली की, ते भाजपचे गुजरात प्रभारी आहेत. यानंतर मी त्यांची भेट घेतली. स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर नरेंद्र मोदींनी माझ्याकडून अयोध्येबाबत माहिती घेतली.

मी त्यांना सर्व माहिती दिली. मुलाखतीच्या शेवटी मी त्यांना प्रश्न विचारला की, आता तुमचं अयोध्येला पुन्हा येणं कधी होईल? तेव्हा ते म्हणाले की, आता मी मंदिराच्या निर्मितीच्या वेळी अयोध्येला पुन्हा येईन आणि आता हे वाक्य खरं ठरलं आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी नरेंद्र मोदी हो पंतप्रधानपदावर असताना अयोध्येत येत आहेत.

ज्यावेळी १४ वर्षांचा वनवास संपवून राम अयोध्येत आले होते त्यावेळी अक्षरशः अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली होती. आता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 वर्षांनंतर अयोध्येत जात आहेत. त्यानिमित्ताने अयोध्येत दिवाळीसारखा जल्लोष करण्याची तयारी सुरू आहे.

महेंद्र त्रिपाठी यांच्याजवळ शिवसेनेच्या काही कारसेवकांचे देखील फोटो आहेत. ज्यामध्ये तत्कालीन आमदार पवन पांडे आपल्या कार्यकर्त्यांसोबत बाबरी मशिदीच्या दगडांसोबत दिसत आहेत. महेंद्र त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेनेचे बाबरी मशिद पाडण्यातील योगदान या फोटोतून स्पष्ट होते.

ज्यावेळी शिवसैनिकांनी बाबरी मशिद पाडली त्यावेळी आपल्यासोबत त्यांनी मशिदीचे दगड देखील नेले होते. ज्याला मीर बांकी म्हणतात. बाबरी मशिद पाडण्यात कामगिरी बजावणाऱ्या त्या शिवसैनिकांचे त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक देखील केले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था