नियतीने माझ्याकडून रथयात्रेद्वारे रामसेवा घडविली; राममंदिराचे भूमिपूजन हा ह्रदयस्पर्शी क्षण; अडवाणींचे भावोत्कट उद्गार


“राममंदिर हे भारतासाठी सामर्थ्य, समृद्धी आणि सर्वांना न्याय देणाऱ्या सौहार्दपूर्ण राष्ट्राचे प्रतिक ठरेल.”


विशेष प्रतिनिधी 

नवी दिल्ली : राम जन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून मीडियाने अनावश्यक राळ उडविली असताना राम मंदिर आंदोलनाचे भीष्म पितामह लालकृष्ण अडवाणी यांनी आज रामभक्तांशी व्हिडिओद्वारे संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन होण्याचा क्षण केवळ माझ्यासाठीच नव्हे तर समस्त भारतीयांसाठी एक भावूक क्षण असेल, अशा शब्दांत अडवाणी यांनी भावना व्यक्त केल्या. तसेच राममंदिर आंदोलनात नियतीने माझ्याकडून सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा घडविली. यातून करोडो भारतीयांच्या मनात रामभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित केली. यासाठी ऋणी असल्याचेही अडवाणी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी हे ज्येष्ठ नेते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत.

 

अयोध्येत बुधवारी होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. कोरोनाच्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे राममंदिर आंदोलनातील फायरब्रँड नेते असणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांच्या प्रतिक्रियेविषयी सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर भूमिपूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला अडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, राममंदिर हे भारतासाठी सामर्थ्य, समृद्धी आणि सर्वांना न्याय देणाऱ्या सौहार्दपूर्ण राष्ट्राचे प्रतिक ठरेल.

It is also my belief that Ram Mandir will represent India as a strong, prosperous, peaceful and harmonious nation with justice for all and exclusion of none so that we can truly usher in Ram Rajya, the epitome of good governance: Veteran BJP leader Lal Krishna Advani. RamMandir pic.twitter.com/92BAOx4Bzi

— ANI (@ANI) August 4, 2020

अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी, या मागणीसाठी अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली होती. यानंतर देशभरात राममंदिराचे आंदोलन तापले होते. याचीच परिणती म्हणून डिसेंबर १९९२ मध्ये कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली होती. या सगळ्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक हिंदुत्त्ववादी नेत्यांवर खटला दाखल करण्यात आला होता. नंतर अडवाणी यांनी बाबरी मशिदीचे पतन हा आपल्या आयुष्यतील सर्वात दु:खद दिवस असल्याचे म्हटले होते. अडवाणी यांनी आपल्या आत्मचरित्रात राममंदिराचा संघर्ष म्हणजे अस्सल निधर्मीवाद आणि pseudo-secularism यामधील द्वंद्व असल्याचे म्हटले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती