जीवन सर्वार्थाने कृतार्थ झाले,मोगल दाम्पत्यांची भावना


श्रीकृष्ण कुलकर्णी

नाशिक : अयोध्येत दुपारी सव्वा बारा वाजता श्रीरामजन्मभूमीचे भूमिपूजन होणार , ५०० वर्षांच्या संघर्षानंतर येणारा क्षण आहे ; आजची पिढी हे पाहू शकते त्यामागे असंख्य लोकांचा त्याग आहे. गेल्या ३-४ दशकांच्या काळात राजकीय, सामाजिक , आध्यत्मिक क्षेत्रातील अनेकानेक लोक या संघर्षांत आपली योगदान दिले. या आंदोलनातील सहभागाने जीवन सर्वार्थाने कृतार्थ झाले. अशी भावना माजी आमदार डॉ.निशिगंधा मोगल आणि राजाभाऊ मोगल या दांपत्यांने व्यक्त केली.

अयोध्येतील राममंदीर उभारणीच्या भूमिपूजनाच्यानिमित्ताने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,जवळपास तीन ते चार वर्षापासून हे आंदोलन सुरु होते, ढाचा पाडून चांगले दिमाखदार मंदीर उभे रहावे हा उद्देश होता. त्यासाठी विश्व हिंदु परिषद व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील घटक त्यासाठी प्रयत्नशील होते. विश्व हिंदु परिषदेने विटांच्या पूजनासारखे कार्यक्रम घेतले, त्यावेळी लोकांच्या मनात प्रभू रामचंद्राविषयींची अस्था,भावना दिसली. त्यामुळे गावोगावी वातावरणनिर्माती होण्यास मदत झाली. संघाचे रामजन्मभूमी आंदोलन सुरु झाले, तेव्हा आम्हाला खऱ्या अर्थाने विषय माहित झाला. तत्पुर्वी आम्हाला हा इतिहास माहित नव्हता.

आम्हाला दोन वेळा तिथे जाण्याची संधी मिळाली, पहिल्यावेळेस मुलायमसिंहाचे तर दुसऱ्या वेळेस कल्याणसिंह यांचे राज्य होते, त्यावेळेस मात्र तो ढाचा नेस्तनाबूत झाला. नाशिकहुन आम्ही ७० ते ८० महिला गेलो होतो, त्यापेक्षाही अधिक असतील पण आम्ही वेगवेगळ्या राहुट्यामध्ये विभागलो गेलो आणि पुन्हा एकत्र आलो नाही.

तिथे हाणामारी,मारझोड होईल, महिलांना कुठे नेता,असाही विचार आला,पण आमचा निर्धार पक्का होता त्यामुळे आम्ही गेलो आणि बाबरी ढाच्याच्या निमित्ताने चाललेले आंदोलन आम्ही तिथे अनुभवले. जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी,साध्वी ऋतंबरा,उमाभारती अशी एकापेक्षा एक सरस भाषणे झाली. ऋतंबराचे भाषण हे मास्टर पिस होते, त्यामुळे रक्त जणू उसळून आले. पण आम्हाला तिकडे ढाचा पाडायच्या मोहिमेत सहभागी होऊ जात नव्हते,पण आम्ही सर्व पाडायची ती कृती बघितली, त्याच्यासाठी इतके वर्षे हिंदु बांधवाचे मृत्यु आणि आंदोलने झाली. ते दृश्य मन हेलावून सोडणारे होते.

हिंदु कायद्यानुसार पूजा करण्याचा हक्क असतांना आमच्यावरच अनेक बंधने लादली गेली, कोर्टकचेऱ्या झाल्या ही दुर्देवी बाब होते, पण ढाचा पाडल्यानंतरची अयोध्येतील दिवाळी ही अवर्णनीय अशीच होती, त्याची तुलना कशाहीही होऊ शकत नाही,हे आनंदाने नमूद करावेसे वाटते.

उत्तम आदरातिथ्याने स्वयंसेवक,कार्यकर्ते भारावले

नाशिक-१९९२च्या कारसेवेसाठी नाशिकमधून आम्ही शेकडो मंडळी गेलो होतो, त्यात आमचे चाटर्ड अकौंटट अशोक जुनागडे, उद्योजक विनायकराव पाटील यासारख्या अनेकांचा सहभाग माझ्यासोबत होता. १९९० सालचा अनुभव लक्षात घेऊन वेळेवर न पोहचता आम्ही चार ते पाच दिवस अगोदरच त्याठिकाणी पोहचलो. संपुर्ण भारतातून लाखो मंडळी तेथे आली होती, चहा,नास्तासह जेवन आणि इतही उत्तम आदरातिथ्य सर्वांचे राखले जात होते,असे भाजप,स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ मोगल यांनी सांगितले.

ते म्हणाले, या घटनेचा एक साक्षीदार मी झालो, यासारखा दुसरा आनंद कुठलाही नाही. जवळपास पाचशे वर्षानंतर ही घटना आपल्याला अनुभवायला मिळत आहे. हातात कुठलेही शस्त्र नसतांना जवळपास एक लाखांहुन अधिक लोकांनी या मोहिमेत सहभागी झाले होते, पहिला डोम पडला आणि एकच जल्लोष झाला.

त्यानंतर आत काहीजण आणखी घुसले आणि इतर उत्खनन सुरु झाले, काहींनी संपुर्ण मस्जिदीभोवती साखली करत,आत काम करणाऱ्यांना जणू संरक्षणच दिले होते. ही काम सुरु असतांना अनेकजण एकमेकांवर पडत होते, काहीजण जखमी झाले होते, अशा जखमींना घेण्यासाठी आंदोलन रूग्णवाहिका येत होती, पण रूग्णवाहिकेचा आवाज ऐकल्यानंतर त्याठिकाणचे स्वयंसेवक,कार्यकर्ते,लोक तिला मोकळी जागा करून देत होते आणि त्यानंतर ती रूग्णवाहिका जखमींना घेऊन निघून जात होती. एवढी मोठी गर्दी असतांना एकही अपघात घडला नाही, सर्व काही व्यवस्थित सुरु होते.

हे शिस्तीचे दर्शन सर्वांकडून दिसले, कुठेही बेशिस्तपणा दिसला नाही,सर्व काम शिस्तबध्दरित्या सुरु होते. हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे असेच आहे. या आंदोलनादरम्यानची अनेक उदाहरणे,अनुभव आहेत. या अनुभवांनी आमचे जीवन मात्र समृध्द झाले. हे आवर्जुन नमूद करावेसे वाटते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था