कार्यात जणू श्रीरामांचा सहभाग,अनोख्या दिवाळीची अनुभूती


श्रीकृष्ण कुलकर्णी

नाशिक : 1990 साली मी प्रथम कारसेवेला गेली होती, १०८ आम्ही लोक होतो, त्यात सर्वात छोटी मी होती. निशीगंधाताई,राजाभाऊ मोगल होते, त्यामुळे १९९२ साली मला घरातून विरोध व्हायचे कारणच नव्हते, त्यावेळी माझा छोटाभाऊ पण माझ्याबरोबर होता, त्याला माझ्या जबाबदारीवर कुटूंबाने जाण्याची परावानगी दिली होती. या साऱ्या घटनेचा आनंद लुटायचा त्याही पेक्षा राममंदीर उभारायचे हाच उद्देश होता, अखेर आम्ही तिकडे गेलो आणि मस्जिद आम्ही म्हणतच नाही, असे भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती वैजयंती सिन्नरकर हिने सांगितले.

अयोध्येतील कारसेवेत दोनदा सहभाग नोंदविणाऱ्या वैजंयतीने आपल्या आठवणींना उजाळा दिला. ती म्हणाली, राममंदीराचा एक भाग पडला कारण तिथ आम्हाला मंदीर बांधायचं होतं, काय वर्णावे असे वातावरण होतं, सकाळी तो ढाचा पाडायला सुरवात झाली आम्ही काहीही हत्यारे बरोबर नेली नव्हती,तेथील लोकांनीच वेगवेगळी हत्यारे आम्हाला आणून दिली. आणि ती घेऊन आम्ही कामाला सुरवात केली आणि पाच तासांच्या आत सर्व जमीनदोस्त झाले आणि या कृतीनंतर आम्ही थक्क झालो.

भगवान श्रीराम तिथं अवतरले आणि त्यांनीच कार्यकर्त्यांच्या माध्मातून ती जागा साफ करून घेतली, एवढेच आम्ही सांगू शकतो या कृतीनंतर एकच जल्लोष झाला, अयोध्यावासियांबरोबरच सर्वांच्याच चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत होता. अयोध्यावासियांनी तर आपल्या घरातील साखर,पेढे अन्य. गोडपदार्थाचे सर्वत्र वाटप सुरु केले.

सायंकाळी घरोघरी अंगणात रांगोळी काढून दिवे लावण्यात आले,सर्वच झगमगाट दिसून आला. आम्हाला जे पाहिजे होते,ते आज झाले आणि ते तुम्ही केले असे अयोध्यावासिय सांगत होते, अयोध्येचे मुस्लिम बांधव सुध्दा म्हणाले की आम्ही तिथे मस्जिद आहे असे मानतच नाही तर ते मंदीरच आहे, अशी आम्ही भावना असल्याचे ते नाशिककरांना सांगत होते, या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजते असेही ती म्हणाली.

राम के वास्ते आप खून बहा सकते हो, हमारे बच्चे भुखे रहेगे

६ डिसेंबरला बाबरी ढाचा उध्दस्त झाला.त्यावेळी तेथील सरकार अस्थिर झाल्याची स्थिती निर्माण झाली होती, ढाचा उध्दस्त करण्याचे काम सुरु असतांना माझ्या डाव्यापायातील बोटाला जखम झाला. त्यामुळे मला श्रीराम रूग्णालयात दाखल केले होते, पण तेथे फारशी सुविधा नसल्याने मला लखनो किंवा अन्यत्र हलविण्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले पण नाशिकच्या माझ्या सहकाऱ्यांनी तात्पुरती बॅन्डेज करून द्या, नाशिकला गेल्यावर तो पुढील उपचार घेईन असे संघाचे कार्यकर्ते अँड.श्याम घरोटे यांनी सांगत आपला परतीचा प्रवास सुरु केला.

रेल्वे प्रवासातील या आठवणी सांगतांना अँड.घरोटे म्हणतात, माझ्या परतीच्या प्रवासातील रेल्वेतील कुपीतला अनुभव हा वेगळा आहे. जखमेचा मला त्रास होत होता पण तसेच पुढे पुढे जात होता, या घटनेमुळे सर्वत्र संचारबंदी होती, त्यामुळे खायला काही मिळत नव्हते, माझे दुखत असल्यामुळे कॉम्बीफल्म सारख्या गोळ्याचा मारा होत होता, माझ्या जवळच एक येवल्यातील कुटुंब बसलेले होते,,वेदना असहय होत होता.

त्या कुटुंबाने त्यांच्या लहान मुलांसाठी डबा आणला होता, तो त्यांनी मला देऊ केला,पण मी डबा घेण्यास नकार दिल्यानंतर ते कुटुंब म्हणाले, आप राम के वास्ते खून बहा सकते हो, तो हमारे बच्चे दोन दिन भूखा नही रह सकते,असे सांगत त्यांनी मला तो डबा खायला दिला. त्यानंतर डॉक्टरांना बोलविले आणि खाललेले असल्यामुळे मला गोळ्या देण्यात आल्या आणि असह्य वेदना अखेर थांबल्या. असे ते म्हणाले.

जात,पंथविसरून सर्वांनी दिला एकच नारा,जय श्रीराम

१९९० ला मी कारसेवेला गेलो, १९९२ लाही मोठा लवाजमा घेऊन अयोध्येस गेलो, भोपाळ पासून संपूर्ण भारतभरातील कारसेवेक पायी आले होते, कुणी,कुणाशी परिचित नाही, भाषा समजत नाही पण एकच वाक्य एकमेकांना कळत होते ते फक्त जय श्रीराम एवढेच वाक्य. याच वाक्यांच्या भोवती गुंफले होते सारे रामभक्त,कार्यकर्ते. गो सेवेची जबाबदारी सांभाळणारे रमेश मानकर सांगत होते.

आपल्या आठवणींना उजाळा देतांना ते म्हणाले, सहा डिसेंबरला सकाळी आम्ही तिथे गेल्यानंतर तिथे कारसेवकांचा उत्साह अवर्णनीय होता, प्रत्येकजण तो बाबरी ढाचा पाडण्यासाठी धडपडत होते, पदाधिकारी,संयोजक वारंवार मागे हटण्याच्या सूचना देत होते,पण सकाळी सकाळी नऊ सव्वानऊला त्या ढाच्यावर पहिल्या टोला स्वयंसेवकांनी टाकला आणि एकच जल्लोष झाला. तीन साडेतीनपर्यत संपुर्ण ढाचा नेस्तानाबूत झाले, अयोध्येत सर्वत्र दिवाळी साजरी झाले, सर्वत्र वाजंत्रीचे सूर निनादले, आज पाच ऑगस्टला राममंदीर भूमिपूजन होते आहे. दुसरी आनंददायी बाब कुठली असूच शकत नाही आणि तेही आम्ही हयात असतांना यापेक्षा आणखी काय पाहिजे,असेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती