अयाध्येतील राम मंदिर भूकंपालाही तोंड देऊ शकणार, हजारो वर्षे टिकणार


अयोध्येतील राम मंदिर जागतिक दर्जाचे बनविण्याचा मानस पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. त्याबरोबरच हे मंदिर अत्यंत मजबूत असणार आहे. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी स्थानावर उभारण्यात येणारे मंदिर मोठ्या भूकंपांनाही तोंड देऊ शकेल अशा मजबुतीने बांधले जाईल. ते किमान एक हजार वर्षे तरी सहज टिकेल, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.


वृत्तसंस्था

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर जागतिक दर्जाचे बनविण्याचा मानस पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे. त्याबरोबरच हे मंदिर अत्यंत मजबूत असणार आहे. अयोध्येत श्रीराम जन्मभूमी स्थानावर उभारण्यात येणारे मंदिर मोठ्या भूकंपांनाही तोंड देऊ शकेल अशा मजबुतीने बांधले जाईल. ते किमान एक हजार वर्षे तरी सहज टिकेल, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले.

चंपत राय म्हणाले, मोठमोठ्या नद्यांवर बांधल्या जाणाऱ्या पुलांच्या खांबांप्रमाणेच या मंदिराचे खांबही मजबूत असतील. मंदिराचा पाया खूप खोल खणला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही नैसर्गिक आपत्तींना तोंड देत मंदिर हजारो वर्षे सहज टिकाव धरू शकेल.


मंदिराचे बांधकाम करणाऱ्या लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो कंपनीचे अधिकारी दोन दिवसांपूर्वी मला भेटले व मंदिराच्या पायाचा नकाशा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती त्यांनी दिल्याचे सांगून राय म्हणाले, कंपनीने अंतिम नकाशा दिला की, ट्रस्ट तो अयोध्या विकास प्राधिकरणाकडून मंजूर करून घेईल. त्यासाठी जे काही शुल्क भरावे लागेल ते आम्ही भरू. त्यात कोणतीही सवलत आम्ही मागणार नाहीत.

अयोध्या आंदोलनात देशभरातील किमान २० हजार साधू-संतांनी भाग घेतला होता. त्या सर्वांना भूमिपूजनासाठी बोलावणे शक्य नव्हते. त्यामुळे आम्ही अयोध्येबाहेरील ९० व अयोध्येतील ५२ साधू-संतांना निमंत्रण दिले. ट्रस्टच्या खात्यात सध्या ४२ कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम लाखो लोकांनी दिलेल्या एक रुपया ते एक कोटी रुपयांच्या देणग्यांमधून जमा झाली, असल्याचे राय यांनी सांगितले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती