राम मंदिराच्या ह्रद्यस्पर्शी भूमिपूजनानंतर पुरोगाम्यांची चाल, म्हणे अयोध्येत बाबरी हॉस्पीटल उभारणार


अयोध्येत बहुप्रतिक्षित राम मंदिर भूमिपूजनानंतर संपूर्ण देशभरात आनंदाची आणि कृतार्थतेची भावना उमटली. मात्र तथाकथीत पुरोगामी वर्गाला पोटदुखीही झाली. चीनी व्हायरसच्या साथीच्या काळात मंदिर उभारणीपेक्षा हॉस्पीटल उभारणीला महत्व द्यायचे होते असे म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका चालू केली. त्याच मालिकेत दांभिक पुरोगाम्यांनी आणखी एक चाल खेळून अयोध्येतील जागेवर मशीद उभारण्याऐवजी मुस्लिम बाबरी हॉस्पीटल सुरू करणार असल्याचे पसरवण्यास चालू केले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : योध्येत बहुप्रतिक्षित राम मंदिर भूमिपूजनानंतर संपूर्ण देशभरात आनंदाची आणि कृतार्थतेची भावना उमटली. मात्र तथाकथीत पुरोगामी वर्गाला पोटदुखीही झाली. चीनी व्हायरसच्या साथीच्या काळात मंदिर उभारणीपेक्षा हॉस्पीटल उभारणीला महत्व द्यायचे होते असे म्हणून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका चालू केली.

त्याच मालिकेत दांभिक पुरोगाम्यांनी आणखी एक चाल खेळून अयोध्येतील जागेवर मशीद उभारण्याऐवजी मुस्लिम बाबरी हॉस्पीटल सुरू करणार असल्याचे पसरवण्यास चालू केले आहे. मात्र, ‘इंडीया टूडे’ या वाहिनीने केलेल्या तपासातून ही अफवा असल्याचे सिध्द झाले आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र, मोदी विरोधकांकडून यावरून सरकारवर टीका सुरू झाली. देशात चीनी व्हायरसचा प्रकोप सुरू असताना राम मंदिराच्या उभारणीवर पैसे खर्च करण्याची काय गरज आहे, असा सवालही करण्यात येत आहे. त्याच्या पुढे जाऊन या तथाकथित पुरोगाम्यांनी आता नवीनच अफवा पसरविली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मशिद बांधण्यासाठी अयोध्येत पाच एकर जागा दिली आहे. या पाच एकर जागेवर बाबरी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय सुन्नी वक्फ बोर्डाने घेतल्याचं सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयानं जी पाच एकर जागा दिली आहे. त्या जागेवर बाबरी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय सुन्नी वक्फ बोर्डाने घेतला आहे. हे हॉस्पिटल एम्ससारखंच असेल आणि तिथे मोफत आरोग्य सेवा दिली जाईल. प्रसिद्ध डॉक्टर काफिल खान यांना या रुग्णालयाचं प्रशासक केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर हॉस्पिटलमधील पूर्ण एक मजला लहान मुलांसाठी आरक्षित असणार आहे. ज्या ठिकाणी मुलांवर उपचार केले जातील, असा मजकूर असलेला हा मेसेज व्हायरल झाला. या वृत्ताबरोबरच मशिदीसाठी देण्यात आलेल्या जागेवर कशा पद्धतीचं हॉस्पिटल बांधलं जाणार आहे, त्यांचं संकल्पचित्रही शेअर करण्यात आलं होतं.

पडताळणीमध्ये व्हायरल झालेला संदेश चुकीचा असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डानेही हा व्हायरल झालेला संदेश खोटा आणि त्याला कसलाही आधार नाही, असे म्हटले आहे. पाच एकर जागेवरील बांधकामाविषयी बोर्डाने अजून कुठलाही निर्णय घेतला नसल्याचं सुन्नी वक्फ बोर्डाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती