योगी सलग तिसऱ्यांदा बेस्ट सीएम; ममता ४ थ्या, उद्धव ठाकरे ७ वे!!


  • योगी २४%, ममता ९%, उद्धव ७%
  • पहिल्या ७ पैकी ६ मुख्यमंत्री भाजपचे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सलग तिसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री ठरले आहेत. ‘इंडिया टुडे ग्रुप’ आणि ‘कार्वी इनसाइट्स’ने केलेल्या ‘मूड ऑफ द नेशन २०२०’ सर्वेक्षणात योगी आदित्यनाथ यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. योगी आदित्यनाथ यांना एकूण २४% मते मिळाली आहेत. ठाकरे – पवार सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे “बेस्ट सीएम” पदावरून घसरून ७ व्या क्रमांकावर आले आहेत.

गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत योगी आदित्यनाथांची मते ६ % वाढली आहेत. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीवरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत असतानाही योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर लोकांनी समाधान व्यक्त केल्याचं दिसत आहे.

सर्वेक्षणानुसार, पहिल्या सातपैकी सहा मुख्यमंत्री हे भाजपा आणि काँग्रेसची सत्ता नसणाऱ्या राज्यांचे आहेत. गेल्या ३ सर्वेक्षणात सलग १ क्रमांकावर राहिलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी ४ क्रमांकावर घसरल्या आहेत. ममता बॅनर्जी यांना ९ % मते मिळाली आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १५ %मतं मिळाले असून ते दुसऱ्या आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी ११ % मतांसोबत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ७% मतांसहित ७ व्या क्रमांकावर आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था