“मैं विकास दुबे हूँ कानपूरवाला” encounter च्या भीतीने ओरडला


  • पण गाव अद्याप भीतीच्या सावटाखालीच

वृत्तसंस्था 

“मैं विकास दुबे हूँ कानपूरवाला,” पोलिसांनी गर्दन पकडून अटक केल्यानंतर तो ओरडला. तो ओरडल्याबरोबर पोलिसाने त्याला फटका मारला. हा आरडाओरडा त्याने encounter च्या भीतीने केल्याचे बोलले जातेय. पण त्याच बरोबर त्याला अटक झाली तो केव्हाही बाहेर येऊ शकतो, या भीतीने गाव मात्र अद्याप दहशतीखाली आहे. त्याची हेकडी अजून गेली नसल्याची भावना आहे.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा केली आहे. विकासला उत्तर प्रदेशाच्या पोलिसांकडे सोपविण्यात येईल.

आठ पोलिसांना निर्दयपणे मारणाऱ्या विकासला स्वत:च्या encounter ला घाबरला. पोलिसांनी विकास दुबेच्या ६ नातेवाईक, गँगस्टरना मारले. दयाशंकर पांडे, महुआ दुबे, अमर दुबे यांना मारले. श्यामू वाजपेयीसकट दोघांना अटक केली. त्याच वेळी पोलिस विकास दुबेच्या हात धुऊन मागे लागले. पण तो उत्तर प्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन उज्जैनला आला. सकाळी ८.३० वाजता तो महांकाल मंदिरात आला. तेथेच त्याला अटक केली.

महाकालेश्वर मंदिरात गर्दन पकडून अटक

  • पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती नाही; मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांचे अटकेचे निवेदन
  • मात्र, विकास दुबेला मरणापासून वाचविल्याचा शहीद पोलिस अधिकाऱ्याच्या नातेवाईकाचा आरोप
  • आठ पोलिसांचा मारेकरी गँगस्टर विकास दुबे याला महाकालेश्वर मंदिरातून मध्य प्रदेश पोलिसांनी गर्दन पकडून अटक केली. सकाळी तो महांकाल दर्शनासाठी आला होता. खासगी सुरक्षा रक्षकाने त्याला ओळखले. सुरक्षा रक्षकांनी त्याची आधी चौकशी केली. पोलिसांना कळवले. दरम्यान त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला गर्दन पकडून अटक केली.

त्याची गर्दन पकडून पोलिस गाडीत बसवत असताना तो “मैं विकास दुबे हूँ कानपूरवाला”, असे ओरडला. पोलिस त्याला गाडीत घालून घेऊन गेले आहेत. अकाली मृत्यूपासून बचावासाठी तो महांकाल दर्शनासाठी आला होता. मात्र शहीद पोलिस अधिकारी देवेंद्र मिश्रा यांचे नातेवाईक कमलाकांत दुबे यांनी मात्र विकास दुबेचा मरणापासून बचाव करण्यात आला आहे, असा गंभीर आरोप केला. विकास दुबेचे राजकीय नेटवर्क कायम आहे. त्याची अटक हे नाटक आहे, असा आरोपही त्यांनी केला. फरीदाबादेतून ११ तास प्रवास करून विकास दुबे हा येतो आणि मंदिराचा सुरक्षा रक्षक त्याला पकडतो, हे संशयास्पद आहे, असे कमलाकांत दुबे यांनी सांगितले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची माहिती दिलेली नाही तरी मध्य प्रदेशाचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी बातमीची खात्री पटवली.

विकास दुबेचे सपा, बसपा नेत्यांशी जवळचे संबंध

आठ पोलिसांचा जीव घेणारा कुख्यात गुंड विकास दुबेचे बसपा आणि सपा या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अतिशय घनिष्ठ संबंध असल्याचे समोर आले आहे. या नेत्यांसोबत त्याचे काही छायाचित्र माध्यमांना मिळाले आहेत.

यातील एका छायाचित्रात विकास दुबे हा अखिलेश यादव सरकारमधील एक वरिष्ठ मंत्री शिवकुमार बेरियासोबत गप्पा करताना दिसत आहे. आधीपासून गुंड प्रवृत्तीचा असलेल्या दुबेला खरे बळ मायावती यांच्या सरकारच्या काळात मिळाले होते, असा सूत्रांचा दावा आहे.

 शिवकुमारसोबतच्या या छायाचित्रानंतर समाजवादी पार्टी संशयाच्या भोवर्‍यात अडकली आहे. सपाचा आमदार सतीश निगमसोबतही दुबेचे मैत्रीचे संबंध असल्याची माहिती आहे. सपा सरकारच्या काळात अनेक मंत्र्यांच्या कार्यक्रमात त्याला निमंत्रण असायचे आणि या मंत्र्यांच्या गाडीतूनही तो फिरायचा, असेही सूत्रांचे मत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती