यूपीमध्ये दंगली घडवायला PFI ला १०० कोटी रुपयांचे फंडिंग

  • मथुरेत पकडलेल्या ४ कार्यकर्त्यांकडून षडयंत्र उघडकीस; दंगलीच्या टीप्स सांगणाऱ्या वेबसाइटशी संबंध
  • ईडीदेखील या प्रकरणाचा करणार तपास

वृत्तसंस्था

लखनौ : उत्तर प्रदेशातील मथुरेतून अटक केलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)च्या ४ कार्यकर्त्यांकडून दंगलीचे षडयंत्र उघड झाले असून PFI ला दंगली घडवायला तब्बल १०० कोटी रूपये फंडिंग झाले आहे. पोलिस तपास आणि चौकशीत ही माहिती पुढे आली.

चौघंविरोधात बुधवारी मांट पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाल् आहे. यात म्हटले आहे की, अतीक उर रहमान, आलम, सिद्दीक आणि मसूदकडून अटकेनंतर ६ स्मार्टफोन, एक लॅपटॉप आणि ‘जस्टिस फॉर हाथरस विक्टिम’नावाचे पांप्लेट आढळले आहे. हे चौघे दंगली पेटवण्याच्या उद्देशाने हाथरसला जात होते. दंगली करून पळून जाण्याच्या टीप्स सांगणाऱ्या वेबसाईटशी या चौघांचा संबंध आहे.

या वेबसाइटला परदेशातून फंडिंग मिळते. यामुळेच आता या प्रकरणात ईडीची एंट्री झाली आहे. हाथरसच्या बहाण्याने जातीय दंगली घडवून आणण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे फंडिंग मिळाले आहे. यात मॉरिशसमधून ५० कोटी रुपये आले आहेत.

आरोपींना रिमांडवर घेऊन चौकशी

आता पोलिस चारही आरोपींना रिमांडवर घेऊन चौकशी करणार आहे. आतापर्यंत केलेल्या तपासात समोर आले आहे की, हे चौघे card.co नावाची वेबसाइट चालवत होते. या वेबसाइटच्या माध्यमातून फंड गोळा करण्याचे काम सुरू होते. या फंडद्वारे दंगल घडवूण आणण्याचा प्रयत्न होता. याशिवाय, या चौघांकडे सापडलेल्या पँपलेटमध्ये ‘ Am I not India’s daughter, made with Carrd’ अशा स्वरूपाचा मजकूर लिहिलेला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*