युरोपात दहशतवाद्याचे थैमान, व्हिएन्नासह सहा ठिकाणी गोळीबार,तिघांचा मृत्यू, संशयित हल्लेखोरही ठार


विशेष प्रतिनिधी 

व्हिएन्ना : ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री हल्ला करत थैमान घातले. अज्ञातांनी राजधानी व्हिएन्नासह सहा ठिकाणी केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे.

त्याशिवाय अनेकजण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचे ऑस्ट्रियाच्या गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. हा हल्ला झाल्यानंतर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एका संशयित हल्लेखोराचा मृत्यू झाला आहे


हल्लेखोरांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेकजण जखमी झाले. यामध्ये एका पोलिसाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या हल्ल्याला दिलेल्या प्रत्युत्तरात पोलिसांनी एका संशयित हल्लेखोराला ठार केले. करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रियात लॉकडाउन सुरू होणार होते. त्यामुळे व्हिएन्नात मोठी गर्दी होती. स्थानिक वेळ सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला.


ऑस्ट्रियाचे चान्सलर सेबेस्टियन कुर्ज यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. आपला दिवस सध्या कठीण आव्हानांचा सामना करत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा या दहशतवादी हल्ल्याचा कट आखणाऱ्यांना नक्कीच शोधून काढतील असेही त्यांनी नमूद केले आहे.

 

दहशतवादासमोर आम्ही कधीच झुकणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. पोलीस दलाकडून दहशवादविरोधी कारवाई सुरू झाली असून दुसरीकडे ऑस्ट्रियाच्या सैन्याला महत्त्वाच्या इमारतींची सुरक्षा सोपवली आहे. व्हिएन्नात लोकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले असून सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहणे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करण्याचेही आवाहन केले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था