गोविंद बागेतला आमरस कडू लागल्याचे राजू शेट्टींना तीन महिन्यांनी समजले, शरद पवारांवर केला विश्वासघाताचा आरोप


  • विधान परिषदेवर पाठविण्याचे आश्वासन फिरवले, तीन महिन्यांत पवारांकडून निरोपच नाही

विशेष  प्रतिनिधी

कोल्हापूर : गोविंद बागेतला आमरस आपल्याला कडू लागल्याचे माजी खासदार राजू शेट्टींना तीन महिन्यांनी समजले. शरद पवारांनी मला विधान परिषदेवर पाठविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, पवारांनी शब्द फिरवला, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.(sharad pawar latest news)

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी एक जागा तुम्हाला देऊ असे आश्वासन शरद पवारांनी आपले कट्टर विरोधक माजी खासदार राजू शेट्टी यांना दिले होते. आधी बारामतीत शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे करणारे राजू शेट्टी त्यावेळी गोविंद बागेत जाऊन आमरसाचा पाहुणचार घेऊन आले होते.

त्यावेळी शरद पवारांसमवेत खासदार सुप्रिया सुळे देखील त्यांच्या पंगतीला होत्या. त्यावेळी पवार आणि शेट्टी यांच्या झालेल्या चर्चेत राजू शेट्टी यांना विधान परिषदेवर पाठविण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखविली होती.

sharad pawar latest news

या घटनेला तीन महिने उलटून गेले. आतापर्यंत शरद पवारांचा निरोपच आलेला नाही, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. राजू शेट्टी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या मुद्द्यावर एनडीए सोडून गेले. नंतर थेट ज्यांच्या विरोधात त्यांनी आयुष्यभर रान पेटवून स्वतःचे राजकीय करिअर घडविले त्या शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन राजू शेट्टींनी आमरसाचा पाहुणचार घेतला.

त्यावेळी पवारांचा आमरस त्यांना गोड वाटला. परंतु, तो पवारांचा आमरस आहे… हेच नेमके ते विसरले. आता त्याची कडवट चव त्यांच्या राजकीय जीभेला जाणवायला लागली आहे. म्हणूनच पत्रकार परिषदेत त्यांनी शरद पवारांनी शब्द फिरवल्याचा आरोप केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था