राजीव गांधी फाऊंडेशनला चीनी फंडिंग कसे?; गृह मंत्रालयाची समिती गैरव्यवहार तपासणार


  •  ईडीच्या संचालकांकडे समितीचे अध्यक्षपद
  •  मनी लाँड्रींग, आयकराचा घोटाळा झाल्याचा संशय

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजीव गांधी फाऊंडेशनला झालेल्या चीनी फंडिंगवरून भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गांधी कुटुंबियांवर थेट शरसंधान साधल्यानंतर फाऊंडेशनच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची समिती नेमण्यात आली आहे.

राजीव गांधी फाउंडेशनला २००५ – ०६ दरम्यान चीनकडून झालेल्या फंडिंगबाबत भाजपने प्रश्न उपस्थित केले होते, आता याप्रकरणी गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी गृहमंत्रालयाची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती गांधी कुटुंबियांशी संबंधित राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या सर्व संस्थांच्या कारभाराची चौकशी करणार आहे. ईडीचे स्पेशल डायरेक्टर या समितीचे प्रमुख असणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याची बातमी दिली आहे.

राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तीनही संस्था थेट गांधी कुटुंबाशी निगडीत आहेत. राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गाधी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्थांच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी काम पाहतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, राहुल गांधी हे या फाऊंडेशनचे सदस्य आहेत. शिवाय इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टचे कामही सोनिया गांधीच पाहतात. या तीनही संस्थांमध्ये मनी लॉंड्रिंग झाले आहे का? किंवा इन्कम टॅक्सचे घोटाळे झालेत का? विदेशी मदतीच्या नियमाचे उल्लंघन झालंय का? हे तपासून पाहिले जाणार आहे.

चीनच्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाने या राजीव गांधी फाऊंडेशनला ३० लाख अमेरिकी डॉलर्सचा निधी दिल्याचा आरोप आहे. चीन सीमेवरच्या घटनेनंतर राहुल गांधी जेव्हा आक्रमकपणे सरकारला प्रश्न विचारू लागले, त्यानंतर भाजपने हा मुद्दा उपस्थित केला होता. काँग्रेस आणि चीनचे गुप्त संबंध असल्याचा आरोपही नड्डा यांनी केला होता. शिवाय याच मदतीच्या बदल्यात भारत आणि चीनमधल्या व्यापारी संंबंधात अनुकूलता दिली गेली, असाही आरोप करण्यात आला आहे.

नड्डा यांनी आणखी 10 प्रश्न जेपी नड्डा यांनी विचारले होते.

कोरोनामुळे किंवा चीनमधील परिस्थितीमुळे मूळ प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करु नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि देशांच्या सीमांचे रक्षण करण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देश सुरक्षित आहे. देशातील जनतेला हे जाणून घ्यायचं आहे की, सत्तेत असताना कॉंग्रेसने काय केलं? देशातील नागरिकांचा कसा विश्वासघात केला? हे सोनिया गांधी यांनी सांगावं, असे आव्हान नड्डा यांनी दिले होते

नड्डा यांनी विचारलेले 10 प्रश्न :

1. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून पैसे का मिळाले?

2. कॉंग्रेस सरकारमध्ये चीनबरोबर व्यापार का वाढला?

3. लक्झमबर्गकडून राजीव गांधी फाउंडेशनला पैसे का मिळाले?

4. पंतप्रधानांची राष्ट्रीय सहाय्यता निधी जनतेची जो जनतेला सेवा आणि मदतीसाठी आहे, यातून राजीव गांधी फाउंडेशनला २००५ ते २००८ पर्यंत पैसे का मिळाले? देशातील जनतेला याचं उत्तर जाणून घ्यायचे आहे. देशातील जनतेने त्यात कष्टाने पैसे दिलेत.

5. यूपीएच्या काळात राजीव गांधी फाउंडेशनला पैसे देण्यासाठी अनेक केंद्रीय मंत्रालये, सेल, गेल, एसबीआय यावर दबाव आणला गेला. एका खासगी संस्थेकडे पैसे पाठवण्याचे काम का केले गेले? यामागील कारण काय होते?

6. या फाउंडेशनमध्ये कॉर्पोरेटकडून मोठा निधी घेण्यात आला. मोठ्या निधीच्या बदल्यात कंत्राटं देण्यात आली. असं का झालं?

7. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीचे ऑडिटर कोण आहेत? ठाकूर वैद्यनाथन आणि अय्यर कंपनी ऑडिटर होती. रामेश्वर ठाकूर हे त्याचे संस्थापक होते. ते राज्यसभेचे खासदार होते आणि चार 8. राज्यांचे राज्यपाल होते. अनेक वर्ष ते ऑडिटर होते. अशा लोकांना अशा प्रकारचे कंत्राट देऊन सरकार काय करण्याचा प्रयत्न करत होतं?

9. राजीव गांधी फाऊंडेशनला जवाहर भवनच्या नावावर कोट्यवधींची जमीन लीजवर कशी दिली गेली? राजीव गांधी फाऊंडेशनची खाती कॅग ऑडिटला का नकार देत आहेत? त्यांचे ऑडिट का झाले नाही? यासाठी आरटीआय का लागू झाला नाही?

10. या फाऊंडेशनने पैसे तर घेतल पण देण्याचंही काम केलं. राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला ही देणगी कशी दिली गेली हे जाणून घ्यायचे आहे.

11. मेहुल चोकसीने राजीव गांधी फाउंडेशनकडून पैसे का घेतले? मेहुल चोकसी याचा काय संबंध आहे? मेहुल चोकसीला तुम्ही कर्ज का दिले? मेहुल चोकसीचा राजीव गांधी फाऊंडेशनशी काय संबंध आहे, हे देशाला जाणून घ्यायचे आहे.

आता भाजपच्या आरोपांवर काँग्रेसचा पलटवार; चिनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडला कोट्यवधींचा निधी दिला का?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केले आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था