पुलवामा हल्ल्यात स्वार्थ शोधणाऱ्यांची विधाने देश विसरू शकणार नाही, मोदींचा काँग्रेसवर निशाणा


  • स्टँच्यू ऑफ लिबर्टीजवळ सरदार वल्लभभाईंना श्रद्धांजली

वृत्तसंस्था

केवडिया : पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ल्यात भारतीय जवानांना शहीद केले. भारतीय विरोधी पक्षांनी मात्र त्या हल्ल्यातही स्वार्थी राजकारणा शोधून बेछूट राजकीय शेरेबाजी केली. ही शेरेबाजी देश विसरू शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. modi latest news

पाकिस्तानने पुलवामा हल्ल्यात हात असल्याची कबुली दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर निशाणा साधला आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात आहे. यासाठी नरेंद्र मोदी गुजरातमध्ये आहेत.

मोदींनी केवडिया येथील “स्टॅच्यू ऑफ युनिटी’जवळ जाऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. मोदींनी यावेळी सिव्हील सर्व्हिसेस प्रोबेशनर्सना देखील संबोधित केले. काही लोक दहशतवादाचे जाहीर समर्थन करत असून हे संतापजनक असल्याचे त्यांनी सांगितले.modi latest news

“आज येथील संचलन पाहताना पुलवामा हल्ल्याचं चित्र डोळ्यासमोर आलं. पुलवामा हल्ला आणि वीर जवान शहीद झाले असताना काही लोक या दुःखात सहभागी नव्हते हे देश विसरणार नाही. हे लोक पुलवामा हल्ल्यातही राजकीय स्वार्थ शोधत होते. त्यावेळी केलेली वक्तव्ये आणि राजकारण देश विसरू शकत नाही.

देशाला इतकी मोठी जखम झाली असताना काही लोकांना हल्ल्यातही राजकारण दिसले. पण हे सर्व होत असतानाही मी सर्व आरोपांना झेललं. अनेक वाईट गोष्टी ऐकत राहिलो. माझ्या मनात वीर जवान शहीद झाल्याची जखम होती. पण काही दिवसांपूर्वी शेजारी देशातून ज्या गोष्टी आल्या आहेत. तेथील संसदेत ज्याप्रकारे सत्य स्वीकारण्यात आलं आहे त्याने या लोकांचा खरा चेहरा देशांसमोर आणला आहे,” असं मोदींनी म्हटलं.

modi latest news

पुढे ते म्हणाले की, “आपल्या राजकीय स्वार्थासाठी कुठपर्यंत जाऊ शकतात हे विरोधकांनी दाखवलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर झालेलं राजकारण याचं मोठं उदाहरण आहे. देशहितासाठी, देशसुरक्षेच्या हितासाठी, जवानांचं मनोबल कमी व्हावं यासाठी तुम्ही राजकारण करु नका. आपण देशविरोधी लोकांच्या हातातील बाहुलं होत तुम्ही ना देशाचं ना आपल्या राजकीय पक्षाचं हित करू शकता. देशहित हेच सर्वोच्च हित आहे”.

“आज जगातील सर्व देश दहशतवादाविरोधात एकत्र आले आहेत. दहशतवाद आणि हिंसाचारातून कोणाचाही फायदा होणार नाही. भारताने नेहमीच दहशतवादाविरोधात लढा दिला आहे,” असं मोदींनी यावेळी सांगितले.

“आज काश्मीर विकासाच्या मार्गावर आहे. ईशान्येतही शांतता पूर्ववरत होते तसंच विकासासाठी पावलं उचलली जात आहेत. भारत एकत्रित येत आहे,” असं मोदींनी म्हटलं. मोदींनी यावेळी करोनाचा उल्लेख करताना इतक्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल याची कोणी कल्पनाही केली नसल्याचे सांगितले. पण देशाने सामूहिकपणे याचा सामना केल्याचं सांगत मोदींनी कौतुक केले. आज भारत करोनामधून बाहेर पडत असून एकत्रितपणे पुढील वाटचाल करत असल्याचं त्यांनी सांगितले

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती