पंतप्रधानांचे “कथित” ५० पलंगी विमान तर यूपीए सरकारनेच मंजूर केले होते…!!

  • राहुल गांधींनी काढलेला बार ठरला फुसका

वृत्तसंस्था 

नवी दिल्ली : ट्रॅक्टरला लावलेल्या कुशनवरून प्रश्न विचारताच त्याला राहुल गांधींनी चिडून उत्तर दिले. ५० पलंगी विमान खरेदी केले “त्यांना” का विचारत नाही?, असे राहुल यांनी सटकवले खरे… पण त्या कथित ५० पलंगी विमान खरेदीचे डील तर यूपीए सरकारच्या काळातच झाले होते.

सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वतील यू्पीए सरकारने VVIP सठी अत्यधुनिक विमान खरेदीची मंजूरी दिली होती. त्याची प्रक्रियाही त्यांनीच सुरू केली होती. तो सर्व घटनाक्रम उघड होतोय. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बेछूट आरोप केले.

पंजाबमधील मोगा येथे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत राहुल गांधी ज्या ट्रॅक्टरमध्ये बसलेले होते. त्याच्या सीटवर कुशन लावले होते. राहुल गांधींचा हा फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. त्यावरून भाजपा नेत्यांनीही त्यावरून खिल्ली उडवली होती.

ट्रॅक्टरवर कुशन वापरल्यासंदर्भात राहुल गांधी यांना पटियाळा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणले,

“हा प्रश्न कधीच विचारला जाणार नाही की, नरेंद्र मोदी यांनी ८ हजार कोटींचे दोन विमान का खरेदी केले. ८ हजार कोटी. त्यात कुशन सोडा, पूर्ण पलंग आहे. म्हणजे एक पलंग नाही, ५० पलंग असतील त्यात. हे का विचारत नाही की पंतप्रधान मोदी यांनी ८ कोटींचे विमान खरेदी का केले, तर त्यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेही तसेच विमान आहे. याबद्दल कुणी विचारत नाही. राहुल गांधी रॅलीला गेले होते, ट्रॅक्टरमध्ये बसले होते कुणीतरी कुशन लावले, हे विचारतात”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

राहुल गांधींचे हे “५० पलंगी” विमान

प्रत्यक्ष फक्त पंतप्रधान वापरणार नाहीत तर ते राष्ट्रपती, उप राष्ट्रपती हे देखील वापरणार आहेत. विमानात आधुनिक संपर्क सोयी आहेतच. त्याच बरोबर मूळत सध्य VVIP वापरत असलेले एअर इंडियाचे विमान २५ वर्षे जुने झाले आहे. त्यामुळे ते बदलणे आवश्यकही आहे. ही आवश्यकता यूपीए सरकारलाही पटली होती. म्हणूनच २०११ मध्ये मंत्रिगट – सचिव गट नेमून प्रक्रिया सुरू केली. या गटंनी जुनी विमाने आधुनिक करून नवी विमाने खरेदीच्याही शिफरशी केल्य्. त्यानुसर २०१२ मध्येच VVIP सठी नवीन विमान खरेदीचे डील यूपीए सरकारने केले होते.

त्यामुळेच कथित ५० पलंगी विमान खरेदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राहुल गांधींनी काढलेला बार फुसका ठरला.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*