मोदी-मोदी! च्या घोषणांनी पाकिस्तानी संसद दणाणली, बलुचिस्तानच्या खासदारांनी दिल्या आझादीच्याही घोषणा


  • पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी घोषणा ऐकून भडकले, पण हतबल होऊन पाहात राहिले

वृत्तसंस्था

इस्लामाबाद : भारतात मोदी विरोधाने आंधळे झालेले डावे – लिबरल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात दररोज मोठमोठ्याने शंख करीत असताना तिकडे पाकिस्तानी संसद मोदी मोदीच्या घोषणांनी दणाणून गेली.

 

पाकिस्तानच्या संसदेत नेमकं चाललंय काय? असाच प्रश्न आज झालेल्या या घोषणाबाजीने समस्त जगाला पडला. कारण आज पाकिस्तानच्या संसदेत चक्क मोदी-मोदी आणि बलुचिस्तानच्या आझादीच्या घोषणा ऐकायला मिळाल्या.

बलुचिस्तानच्या खासदारांनी पाकिस्तानच्या संसदेत मोदी-मोदी आणि आझादीच्या घोषणा दिल्या. परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांचा चेहरा रागाने लालबुंद झालेला पाहण्यास मिळाला.

 

शाह मेहमूद कुरेशी हे फ्रेंच उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासंबंधीची त्यांची भूमिका मांडत होते. त्यावेळी बलुचिस्तानच्या खासदारांनी मोदी-मोदी आणि आझादीच्या घोषणा दिल्या. इम्रान खान सरकारवर असलेला राग यातून दिसून आला. तसंच इम्रान खान सरकार करोनाची परिस्थिती हाताळण्यातही अपयशी ठरलंय असंही या खासदारांचं म्हणणे आहे.

 

 


पाकिस्तानमध्ये आलेल्या करोना संकटाचा मुकाबला इम्रान खान सरकारला योग्य रितीने करता आला नाही असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान आज पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमुद कुरेशी हे बोलण्यासाठी उभे राहिले, फ्रान्सच्या उत्पादनांवर पाकिस्तानने बहिष्कार घातला पाहिजे असं ते सांगत होते त्याचवेळी बलुचिस्तानच्या खासदारांनी मोदी-मोदी आणि आझादी या घोषणा देण्यास सुरुवात केली. यामुळे कुरेशी यांचा राग अनावर झाला होता. त्यांचा चेहरा ते स्पष्ट सांगत होता. एवढंच नाही विरोधी पक्षांकडूनही त्यांच्या भाषणात वारंवार घोषणाबाजीने व्यत्यय आणला गेला

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    India’s Cheapest Electric Car Launched Tata Tiago EV From Just 8.49 Lakhs; वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती