मराठा आरक्षण: वेळ आल्यास घटनादुरूस्ती साठीही अभ्यास सुरु : संभाजीराजे

  • संभाजीराजे छत्रपती यांचं महत्त्वाचं वक्तव्य

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला अडचणींचा सामना करावा लागतो आहे. अशात मराठा आरक्षण हा मुख्यत्वे ठाकरे सरकारचा विषय आहे.

यामध्ये केंद्र सरकारची मदत लागली आणि घटनादुरूस्तीचाही विषय असेल तर त्याबाबतही माझा अभ्यास सुरु आहे. असं वक्तव्य खासदार संभाजीराजेंनी केलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी पंढरपूरच्या महापुरानंतरच्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले संभाजीराजे?

“मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे. आपण एसीबीसी हा कायदा तयार केला आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं मागासवर्गीय आयोगने म्हटलं आहे त्यामुळे ते सिद्ध झालं आहे. दरम्यान विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी मराठा आरक्षणासंदर्भातल्या कायद्याला मंजुरी दिली आहे. तो पारित झाला असून हायकोर्टानेही त्याला मान्यता दिली आहे.

तरीही मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर केंद्र सरकारची काही मुव्हमेंट असेल उदा. घटना बदल करायची असेल तर त्या दृष्टीनेही माझा अभ्यास सुरु आहे. घटना बदल केल्यास तो विषय देशासाठीच लागू होईल” असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*