मराठा आरक्षणात ठाकरे – पवार सरकारचा हलगर्जीपणा; अशोक चव्हाणांकडून फसवणूक; विनायक मेटेंचा आरोप


  • गुरुवारपासून राज्यात आंदोलन

विशेष प्रतिनिधी

नाशिक : सर्वच बाबतीत अपयशी ठरलेल्या ठाकरे – पवार सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचीही उदासिन भूमिका होती. चव्हाणांनी तर फसवणूकच केली आहे, आरक्षणाबाबत ते बोलतात वेगळे, करतात वेगळे त्यामुळे त्यांच्यावर अजिबात विश्वास नाही, असा आरोप, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला.

मेटे हे नुकचे नाशिकला आले होते. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर संवाद साधला. ते म्हणाले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण निष्क्रीय आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना समितीचे अध्यक्ष करावे,अशी माजी मागणी आहे. मराठा आरक्षण समन्वय समितीची पुढील दिशा स्पष्ट करतांना त्यांनी नऊ संघटनांनी एकत्र येऊन मराठा समन्वयक समिती स्थापन केल्याचे नमूद केले.

किती हा हलगर्जीपणा

ते म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे सरकारच्या हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, त्यामुळे येत्या सहा ऑगस्टपासून महाराष्ट्रात मोठे आंदोलन करणार आहोत. शासनाच्या बैठकीत सरकार म्हणाले की सर्व तयारी झालेली आहे,पण दुर्देवाने शासनाचे वकील सांगता,की आमची तयारी झालेली नाही. याचा अर्थ ठाकरे सरकार आणि अशोक चव्हाण सांगतात ते केवळ आणि प्रत्यक्ष वागतात ते वेगळे आहे. त्यामुळे हे सरकार समाजाशी खोट बोलत आहे, असा आरोपही त्यांनी केला. अनुभवी वकीलांना बाजू केले जात आहे. सरकारमध्येच काही लोक विरोधातील लोकांना मदत करत आहेत असेही त्यांनी नमूद केले.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था