पंकजा, प्रकाश आंबेडकरांवर गुन्हे दाखल करणारे ठाकरे – पवार सरकार मालेगावच्या मुस्लिमांसमोर लुळे पडले


  • पंकजा, प्रकाश आंबेडकरांविरुद्ध गुन्हे दाखल; पण मालेगावात जुलस काढणाऱ्यांवर ठाकरे – पवार सरकारची कारवाईची हिंमत नाही
  • ईद मिलादनिमित्त जुलूस काढणाऱ्या मुस्लिमांना पोलिस खात्याचे “अभय” गुन्हे नोंदवणे दूरच; शांततेत सण पार पडल्याची दिली ग्वाही

विशेष प्रतिनिधी

मालेगाव : दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमा केली तसेच सोशल डिस्न्टसिंगचा भंग केल्याप्रकरणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि ऊस कामगारांच्या प्रश्नी मेळावा घेणारे रिपाई नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिस खात्याने काल ईद मिलाद निमित्त मुस्लिमांनी काढलेल्या जुलूसाच्या बाबतीत तेवढी तत्परता दाखवली नाही. जुलूस काढून १६ तास उलटून गेले तरी एकही एफआयआर नोंदला गेला नव्हता. malegaon ka juloos

पंकजा मुंडे आणि प्रकाश आंबेडकरांवर एफआयआर दाखल करायला पुढे सरसावलेल्या ठाकरे – पवार सरकारच्या पोलिसांच्या लेखण्या मालेगावच्या मुस्लिमांसमोर मात्र लुळ्या पाडल्या. ठाकरे – पवार सरकारचे नियम तोडून शक्तीप्रदर्शन करणाऱ्यांना मुस्लिमांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी हा सण शांततेत उत्साहात पार पडला असे सांगत जणू प्रमाणपत्र देत “अभय” दिल्याने हिंदूमध्ये संतापाची लाट उसळली आहे.malegaon ka juloos

राज्यात हिंदु बांधव मंदिरे उघडावीत यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांची उंबरे झिजवत आहेत. त्यासाठी आंदोलन करत मंदीरे उघडण्याची याचिका करत आहे, मात्र निद्रीस्त सरकारला त्याचे काही देणे घेणे नाही, कोरोनाचे कारण दाखवत घरीच बसण्यास प्राधान्य देणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे जबाबदारी झटकत आहे. हिंदुच्या बाबतीत नियमावली सांगितली जात आहे तर मुस्लिमांना पूर्णपणे मोकळीक दिलेली दिसते, मास्क वापरणे,सॅन्टेटायझर सोडाच पण सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा करण्यात हेच बांधव सर्वात पुढे असल्याचे दिसले, मग ते औरंगाबाद असो,मालेगाव असो कि भिवंडी,मुंबईतील मुस्लिमबहुल वसाहत सर्व ठिकाणी नियमांची ऐशीतैशी केली जात आहे.

कुणीच वाकडे करू शकत नाही

हिंदुच्याबाबत कडक भूमिका घेणारे पोलिस खाते मुस्लिमांच्या बाबतीत मात्र मवाळ झालेले दिसत आहे. काल मालेगावला ईद मिलादच्या जुलूसावेळी जथ्येच्या जथ्ये चौकाचौकातून बाहेर पडत होते, मोठ्या संख्येच्या गटाने वावरणाऱ्या या मुस्लिमांवर कुणाचाही वचक नव्हता, पोलिसच काय कुणीही आमचे वाकडे करू शकत नाही,जणू अशाच अविर्भावात हे सारे इकडे तिकडे फिरतांना दिसले.

malegaon ka juloos

कुणाच्या कृपार्शिवादाने सारे मिटले?

मालेगावमध्ये काल बंदोबस्त जरूर ठेवण्यात आला होता, मात्र बंदोबस्तावर असणारे पोलिसही बघ्याच्या भूमिकेत होते. ते काहीही करू शकले नाहीत. विनामास्क वावरणारे, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा करणाऱ्या या मुस्लिमांना मग नियम,कायदे नाहीत का, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे. कालच्या घटनेनंतर आज जुलूसानिमित्त गर्दी जमा केली म्हणून या मोकाट फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते मात्र पोलिसांनी नेहमीप्रमाणे ते टाळले.

हे सर्व कुणाच्या कृपार्शिवादाने झाले हे न सुटणारे कोडे असले तरी यामागे नक्कीच मताच्या बेगडीसाठी कायमच या वर्गाचे लांगुलचालन करणारे कृषीमंत्री तर नसावेत ना?, अशी शंकेची पाल चुकचूकत आहे. नियमांचे सरार्स उल्लंघन करणारे व्हिडीओ, फोटो वर्तमानपत्रातून शेअर झाले आहे, हा मोठा पुरावा असतानाही पोलिस संबंधीतांविरूध्द गुन्हे दाखल करण्यास का धजावले नाही,असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था