“फक्त विवाहासाठी धर्मांतर” अपात्र ठरविणाऱ्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान


  • वकील अल्दानिश रीन यांच्याकडून केवळ विवाहासाठी केलेले धर्मांतर अपात्र ठरवण्याच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ‘केवळ विवाहासाठी केलेले धर्मांतर अपात्र आहे,’ या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. (love jihad news) एखाद्या व्यक्तीला कुठलाही धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य नसेल, तर त्याच्या मूलभूत हक्कांवरील ती गदा असेल, असे या याचिकेत म्हटले आहे. वकील अल्दानिश रीन यांनी ही याचिका दाखल केली आहे.love jihad news

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या एक रिट याचिकेद्वारे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या विवाहासाठी धर्मांतर निर्णयाला हे आव्हान देण्यात आले आहे. हा निर्णय चुकीचा आदर्श समोर ठेवत असल्याचा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतलाय. सोबतच अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

केवळ विवाहाच्या उद्देशाने केलेले धर्मांतर अपात्र ठरवत एका भिन्न धर्मीय विवाहीत जोडप्याला पोलीस संरक्षण देण्यास नकार देऊन उच्च न्यायालयाने “चुकीचे उदाहरण” समोर ठेवल्याचे याचिकाकर्ते अल्दानिश रीन यांनी म्हटले आहे.love jihad news

भिन्न धर्मीय विवाह करणाऱ्या या जोडप्याला त्यांच्या कुटुंबीयांच्या घृणेसमोर न्यायालयाकडून मदतीविना सोडून देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही एका व्यक्तीने धर्मांतर करून आंतरधर्मीय विवाह केला जाऊ शकत नाही, असे चुकीचे उदाहरण न्यायालयाने समोर ठेवले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय

अलाहाबाद उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात एका विवाहित जोडप्याला पोलीस सुरक्षा देण्यास नकार दिला होता. या निर्णया दरम्यान, एखाद्या व्यक्तीने एखाद्या भिन्न धर्म केवळ सांसारिक लाभ किंवा फायद्यासाठी स्वीकारला असेल तर ही धार्मिक कट्टरता असेल, या सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा उल्लेख केला होता. या प्रकरणात याचिकाकर्ता आणि त्याची बहिण दोन्हीही मुस्लीम धर्माशी संबंधित आहेत. विशेष विवाह कायद्यानुसार, दोघांनीही संबंधित हिंदू पती-पत्नीशी विवाह केलेला आहे.

love jihad news

‘लव्ह जिहाद रोखणार

दुसरीकडे, कर्नाटकात ‘लव्ह जिहाद’ रोखण्याचा निर्धार मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी व्यक्त केला. लग्नासाठी सक्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी राज्यात ठोस उपाय योजल्या जातील, असे येडियुरप्पा यांनी म्हटलेय. मंगळुरूमध्ये ते भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती