इस्लामी कट्टरते विरोधात बोलणाऱ्या फ्रान्स विरोधात इस्लामी देश एकवटले


  • फ्रेंच वस्तूंवर अरब जगतात बहिष्कार

वृत्तसंस्था

लंडन : पैगंबर मोहम्मद यांचं कार्टून दाखवणाऱ्या फ्रान्समधील शिक्षकाच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्लामी कट्टर चे विरोधात आघाडी उघडली याविरोधात इस्लामी देश एकवटले आहेत.islamic countries

मॅक्रॉन यांनी आपल्या वक्तव्यात ‘कट्टरवादी इस्लाम’वर टीका केली होती आणि शिक्षकाची हत्या म्हणजे ‘इस्लामिक दहशतवादी हल्ला’ असं म्हटलं होतं. त्यानंतर अनेक अरब देशांनी फ्रान्सच्या उत्पादनांचा बहिष्कार सुरू केला आहे. कुवेत, जॉर्डन आणि कतारमधील काही दुकानांमधून फ्रान्समधील उत्पादनं हटवण्यात आली आहे. लिबिया, सीरिया आणि गाझा पट्टीत फ्रान्सच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत. बीबीसीने ही बातमी दिली आहे.

यावर फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, बहिष्काराच्या गोष्टी अल्पसंख्याक समुदायातील कट्टर गटच करू शकतो. पैगंबर मोहम्मद यांचं वादग्रस्त कार्टून वर्गात दाखवल्याप्रकरणी एका शिक्षकाची हत्या झाल्यानंतर मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद सुरू झाला आहे.

एका विशेष समुदायाच्या भावनेचा विचार करून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता येऊ शकत नाही, असं म्हणत मॅक्रॉन यांनी स्वत:चा बचाव केला आहे. यामुळे धर्मनिरपेक्ष फ्रान्सची एकता कमी होते, असंही त्यांचं म्हणणं आहे. मॅक्रॉन यांनी या शिक्षकाच्या हत्येपूर्वी फ्रान्समध्ये इस्लामिक कट्टरतावाद मोडून काढण्यासाठी कठोर कायदे बनवण्याची घोषणा केली होती.

“मला भीती वाटते की फ्रान्समधील जवळपास 60 लाख मुस्लीम लोकसंख्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळी पडू शकते,” असं त्यांनी म्हटलं होतं. तसंच इस्लाम म्हणजे असा धर्म जो संकटात आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. मॅक्रॉन यांच्या वक्तव्यावर मोठी टीका झाली आहे. टर्की आणि पाकिस्ताननं मॅक्रॉन यांच्यावर आरोप केला आहे की, ते श्रद्धेच्या स्वतंत्रतेचा सन्मान करत नाहीत. तसंच फ्रान्सच्या मुस्लिमांना एका बाजूला ढकलत आहेत.

islamic countries

रविवारी (25 ऑक्टोबर) टर्कीचे राष्ट्रपती रेचेप तैय्यप अर्दोआन यांनी मॅक्रॉन यांना ‘मानसिक उपचार’ करण्याचा सल्ला दिला आहे. अर्दोआन यांच्या या टीकेनंतर फ्रान्सने टर्कीमधील आपल्या राजदुताला परत बोलावलं आहे.

बहिष्कारचं स्वरूप किती मोठं?

रविवारी जॉर्डन, कतार आणि कुवैतमधल्या काही सुपरमार्केटमधून फ्रान्सचं सामान हटवण्यात आलं. उदा. फ्रान्समधील सौंदर्य प्रसाधनं दुकानांमध्ये दिसली नाहीत. कुवेतमधील एका मोठ्या कंपनीनं फ्रान्सच्या उत्पादनांचा बहिष्कार करण्याचा आदेश दिला होता.

ग्राहक समितीच्या अशासकीय संघानं म्हटलं की, “त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वारंवार करण्यात आलेल्या अपमानाला उत्तर म्हणून असे निर्देश जारी केले आहेत.” एका निवेदनात फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, “बहिष्काराची चर्चा अल्पसंख्याक समाजातील एक कट्टर गट करत आहे आणि त्यांनी तत्काळ बहिष्कार मागे घ्यायला हवा.” सौदी अरेबियातही सोशल मीडियाच्या माध्यमातून बहिष्काराचं आवाहन करण्यात आलं आहे.

अरब जगतातली सगळ्यांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या सौदी अरेबियात फ्रान्सची सुपरमार्केट चेन कॅरेफोरवर बहिष्कार करण्यासंबंधीचा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत होता. लिबिया, गाझा आणि उत्तर सिरियातही फ्रान्सविरोधात निदर्शनं झाली. या भागांमध्ये टर्कीच्या पाठिंब्यानं मिलिशियाचं नियंत्रण आहे.

पाकिस्ताननं काय म्हटलं?

टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी एका भाषणादरम्यान प्रश्न उपस्थित केला होता की, “मॅक्रॉन नावाच्या व्यक्तीला इस्लाम आणि मुस्लिसांविषयी काय समस्या आहे?” तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मॅक्रॉन यांच्यावर आरोप केला आहे की, मॅक्रॉन इस्लामविषयी कोणतंही स्पष्ट ज्ञान नसल्यामुळे इस्लामवर टीका करत आहेत. इम्रान खान यांनी रविवारी (25 ऑक्टोबर) फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इस्लाम विरोधी माहिती हटवण्याचं आवाहन केलं आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था